Sunday, October 28, 2018

वाचकाच्या मनाला स्पर्शुन जाणाऱ्या कथा


                                         गंधाली

                                                                      

                                                लेखक - रणजित देसाई

 

 महाराष्ट्रातील थोर,सृजनशील,प्रतिभावंत लेखक स्वामीकर रणजित देसाई लिखित 'गंधाली' हा ऐतिहासिक  कथा संग्रह  घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे.  ऐतिहासिक विषयावरील लेखक रणजित देसाई यांच लिखाण म्हणजे क्या बात. त्यांनी लिहिलेल्या इतिहासा मधील त्या सर्व व्यक्तीरेखा ज्वलंत पणे आपल्या  नजरे समोर उभारतात आणि त्या व्यक्तीरेखे विषयी ओढ निर्माण होते. जणु त्या व्यक्तीना आपण जवळून ओळखतो असाच भास होतो. मग ते स्वामी कादंबरी मधील थोरले माधवराव पेशवे आणि त्यांची पत्नी रामा बाई असो वा पावनखिंड या कादंबरी मधील बाजीप्रभु.

१५८ पानाच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन सुंदर चाफ्याची फुलं आहेत. चाफ्याची फुले हे प्रेमाचं प्रतीक आहे. आजच्या युगातील गुलाबाच्या फुलांनी प्रेम व्यक्त होत असलं तरी त्या काळी चाफ्याच्या फुलांची गंमत काही वेगळीच. आजच्या रोमँटिक होऊ पाहणाऱ्या पिढीला प्रेमाची खरी व्याख्या सांगणारा हा कथा संग्रह आहे. यामध्ये प्रेम आणि वेदना यामधील नातं सांगणाऱ्या कथा आहेत.

बाजीरावांच्या मृत्युने विष पिणारी मस्तानी यांची कथा अंगावर शहरे आणते. बंदेअलींच्या आयुष्याचा सुर असणारी त्यांची पत्नी चुन्ना हे जणू दोघे एकमेकांशी एक रूप असावेत असे त्याचे प्रेम. छत्रपती शिवरायांच्या मृत्यु नंतर सती जाणाऱ्या पुतळा राणी सरकार यांनी त्यांच्या शिवरायांवर असणाऱ्या असीम प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. पुस्तकांच्या शेवटची कथा ही मेहलका हिची आहे. आपल्या बुद्धीने दरबाराचे  मन झिंकणारी महेलका तिच्या प्रेमाचा गंध यामध्ये सांगते. प्रत्येक कथा मनाला स्पर्शुन जाते. प्रत्येक कथा वाचत असताना त्याच विश्वात, त्याच युगात आपण गेलो आहोत याचा भास होतो.जेव्हा ती कथा संपते तेव्हा त्या प्रेमा विषयी वाचुन मन सुन्न होत.

वाचकाच्या मनाला स्पर्शुन जाणाऱ्या कथा म्हणजे अशी छेडली तार आणि अशी रंगली प्रीत. या दोन कथांनी खर प्रेम काय असत आणि निस्वार्थीपणाने केलेल्या प्रेमाचं मोल काय असत हे समजतं.

पुस्तका मधील भाषा ऐतिहासिक आहे त्यामुळे आपण त्या इतिहासामध्ये रमुन जातो. पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन यांनी केले आहे. ऐतिहासिक वाचण्याची ज्यांना आवड आहे आणि प्रेमाचा खरा गंध समजून घेणाऱ्यांसाठी तसेच, सर्व वाचकांनी जरूर वाचावे असे हे पुस्तक लेखक रणजित देसाई लिखित 'गंधाली'.

 

      -श्रीजीवन तोंदले

5 comments:

  1. अमृतवेल कादंबरी वाचली असेल तर त्या बद्दल थोडं लिहा

    ReplyDelete
  2. हो अमृतवेल ही कादंबरी मी वाचली आहे, लवकरच त्या बद्धाल हि लिहित आहे...

    ReplyDelete
  3. गंधाली एक अवर्णनीय प्रेम कथा आहे.

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.