मर्डर इन माहीम
लेखक - जेरी पिंटो
मराठी अनुवाद - प्रणव सखदेव
मुंबई... महाराष्ट्राची राजधानी...फक्त महाराष्ट्राचीचराजधानी नव्हे तर
भारत देशाची आर्थिक राजधानी. मुंबई शहर हे खेळ,राजकारण,मनोरंजन,ह्या आणि इतर सर्व गोष्टींचे केंद्र स्थान. त्यामुळे मुंबईमध्ये
होणाऱ्या बारीकसारीक गोष्टींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून असते. या शहरामधील गुन्हेगारी विश्व
हे तर खूपच मोठं आणि न समजणारे. पण त्यावर मुंबई पोलिसांची एक वेगळीच पकड आहे. ही चंदेरीनगरी लांबून चमकणारीवाटत असली तरी तिच्या आत
मध्ये खूप काही घडत असत. थोडासा जरी अंधार (काळोखी निर्जन स्थळ) सापडल तर या
अंधारामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतात. हा अंधार सापडतो तो रेल्वे
स्टेशनच्यापादचारी पुला खाली किंवा रेल्वे स्टेशन वरील सरकारी स्वच्छता
गृहामध्ये. प्रेमी लोकांना आपले प्रेम
किंवा आपल्या शरीराची ऊब मिळवण्यासाठी या जागेचा खरा वापर होतो. मग ते भिन्न लिंगांमध्ये
होणारे चाळे असो वा समलिंगामध्ये होणारे चाळे, या अंधारामध्ये होत असतात.या
अंधारामध्ये मोठे गुन्हेही घडत असतात......
नमस्कार मंडळी, आज एक रहस्य भेद करणारे आणि मुंबई मधील एका वेगळ्या विश्वाची ओळख
करून देणारे, असे पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो
आहे. पत्रकार आणि एक आघाडीचे लेखक जेरी पिंटो यांनी लिहिलेली आणि माझे मित्र लेखक
प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केलेली कादंबरी 'मर्डर इन माहीम'. पुस्तकाच्या नावावरून तुम्हाला थोडी कल्पना आली असेल की याची कथा काय असेल. मुंबईमध्ये खुप
छोटे-मोठे गुन्हे घडत असतात. त्यामागे एक वेगळीच पार्श्वभूमी असते. ती समजल्यावर
आपल्याला धक्का तरी बसतो किंवा गंमत तरी वाटते. अशीच काहीतरी कथा या पुस्तकात मांडलेली आहे. माहीम रेल्वे स्टेशनच्या निर्जन
आणि अंधाऱ्या पुरुष मुतारीमध्ये एका तरुणाचा खून होतो. आणि इथून कथेला सुरूवात होते.
कथेमध्ये तशा खूप व्यक्तीरेखा आहेत.माहीम रेल्वे
स्टेशनच्यापुरुष मुतारीमध्ये झालेला खूनहा इतका निर्घृण असतो की त्या तरुणाची किडनी हाताने काढलेली
असते.या निर्घृण खूनाचा शोध निवृत्त पत्रकार पीटर हा इन्स्पेक्टर झेंडे सोबत करत असतो.
पोलीसांपेक्षा पीटरच या गुन्ह्याचा जास्त तपास घेत असतो आणि शेवटी तोच आरोपीचा शोध
घेतो. असं वाटतं की पोलीस यंत्रणा लेखकाने फक्त नावालाच कथेमध्ये घेतली आहे.
रहस्यमय वाटणारा हा खुनाचा प्रवास आणि त्यामधून मुंबई मधील गे म्हणजे समलैगिक
लोकांच्या विश्वाची ओळख आणि त्यांचे आयुष्य लेखकाने वाचकांच्या समोर मांडले आहे.
पुस्तकामधील याच गे विश्वाचा पुढे पुढे वाचकाला त्रास होतो, कारण गरज नसतानासुद्धा काही काही
गोष्टी ह्या कथेच्या मध्ये मध्ये येतातआणि त्यामुळे वाचकाची एकाग्रता भंग होते. पण
कथे मधील गे पुराण हेच कथेचा गाभा आहे, त्यामुळे ते वाचावेच लागते कारण
त्याशिवाय संपूर्ण घटनाक्रम समजत नाही.
'मर्डर इन माहीम' यामूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखक प्रणव सखदेव यांनी
केला आहे. पुस्तकाचा अनुवाद अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत
वाक्य रचनेत केला आहे. पण मराठी अनुवाद उत्तम झाला आहे. लेखक प्रणव सखदेव यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
रहस्यमय आणि प्रत्येक पानावर उत्कंठता
वाढवणारे,लेखक जेरी पिंटो यांनी
लिहिलेले आणि लेखक प्रणव सखदेव यांनी मराठी अनुवाद केलेले'मर्डर इन माहीम' हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावेच असे आहे. प्रत्येक वाचकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. नक्की वाचा.मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन
यांनी केले आहे.
जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा
रोहन प्रकाशन यांच्या इतर दर्जेदार पुस्तकांसाठी आणि माहितीसाठी click करा.