- नारायण धारप
नमस्कार मित्रहो आज रविवार मी तुम्हाला
एका रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेल्या
कादंबरी विषयी सांगणार आहे. रहस्यमय आणि गूढ लेखन म्हंटल कि त्यांचं
नाव अव्वल स्थानी येते. माझ्या पिढीला त्यांचं नाव नवीन असले तरी अशा लिखाणानी त्यांनी
एक काळ गाजवला होता.मला पूर्ण खात्री आहे कि माझ्या पिढीला सुद्धा त्यांच्या
रहस्यमय आणि गूढ लिखाणाची ओढ लागेल.मी असं हि ऐकलं आहे कि ज्या काळामध्ये दूरदर्शन
आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चालत नव्हती
तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा.रहस्यमय आणि
गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणी द्वारे शेवट
पर्यंत खेळवत ठेवणारे लेखक म्हणजे आदरणीय नारायण
धारप(सर).
नारायण धारप(सर) यांच्या अशाच रहस्यमय
आणि गूढ कादंबरी मधील एक कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती म्हणजे चेटकीण. या
कादंबरीची पहिली आवृत्ती २००२ मध्ये प्रकाशीत झाली आणि त्यानंतर या कादंबरीने
वाचकांना अक्षरश्या वेढ लावले. कादंबरीच्या मुखपृष्ठावर लाल अक्षरामध्ये चेटकीण
लिहिलं आहे.एक खिडकी आहे आणि त्या खिडकी मधुन एक जुने घर दिसते. कादंबरीचे मुखपृष्ठ संतुक गोळेगावकर यांनी साकारलेले आहे.
कादंबरी २०८ पानांची आहे. एकदा वाचायला
सुरवात केली की ती हातातुन सोडवत नाही. मी तर हि कादंबरी एका रात्रीत वाचून काढली
आहे. मनाला आदिम उत्कंठा लावणारी अशी हि कादंबरी. कादंबरीची सुरुवात होते ती कथेची नायिका सोनाली अमेरिकेहून भारतामध्ये परत येते. सोनालीच्या आजीच्या
मृत्यू नंतर पुढच्या विधीसाठी दांडेकर कुटुंबीय त्यांच्या वाडीवर जातात. दांडेकरांचीवाडी गजबजलेल्या वस्ती पासुन अगदी दूर त्या दोन वस्तुंना
घेऊन एका कोपऱ्यात असल्या सारखी. खुप वर्षांनी सोनाली अमेरिकेहून परत आलेली असते.वाडीवर तर ती
पहिल्यांदाच आलेली असते.वाडी वरच्या आजूबाजूच्या परिसराविषयी तिला ओढ निर्माण होते. तिला
जास्त कुतूहल आणि उत्कंठा वाटते ती त्या बंद वास्तू विषयी.त्या ओढीमुळेच ती वाडीचा
आणि त्या बंद वास्तूचा इतिहास जाणुन घेते. त्या वास्तू मध्ये एक पिशाच्च शक्ती बंद
आहे. काही लोक त्या शक्तीचे शिकार होतात तर काही त्या शक्ती पासुन अगदी
सुखरूप परत येतात.मानवाला काही गोष्टी म्हणजे काही आजार काही सवयी त्या त्याला त्याच्या अनुवंशिकतेमुळे मिळतात.या गोष्टी मध्ये त्याच अनुवंशिक
गुणधर्माने सोनालीला त्या बंद वास्तूमधील पिशाच्च शक्ती दिसत असते.चित्तथरारक,रोमहर्षक,अकल्पित,गूढतेची एखाद्या भयपटाला शोभावी अशी हि
गोष्ट. लेखकाने इतक्या उत्तम प्रकारे मांडली आहे
की कादंबरी वाचकाला तिच्याकडे ओढून धरते. हीच तर लेखन नारायण धारप यांच्या लेखनाची खासियत आहे जी वाचकाला अक्षरशः वेड लावते.
कादंबरीचे प्रकाशन साकेत प्रकाशनने केले
आहे. कादंबरी शेवट पर्यंत वाचकाला धरून ठेवते. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक
असायला हवेच.भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड
ठेवणाऱ्यांसाठी. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी हि
कादंबरी लेखन नारायण धारप लिखित चेटकीण.
- - श्रीजीवन तोंदले
पुस्तक- चेटकीण
पुस्तक- चेटकीण
लेखक-नारायण धारप
पृष्ठसंख्या-२०८
मूल्य-२५०
Mi pan atta vachanar chetkin
ReplyDeleteJarur vacha
ReplyDeleteKhupach chan aahe...
ReplyDeleteMe ekda vachali aahe ani punha vaChaychi iccha aahe...
Chan
ReplyDelete