Sunday, February 10, 2019

shinznal kiss- Shinichi Hoshi


शिन्झन किस
लेखक शिनइची होशी (अनुवाद निसीम बेडेकर)

सर्वांनाच पुस्तकं वाचावी अस वाटत असत.पण नेमकं कोणत्या पुस्तकाने वाचनाला सुरवात करूया...? आणि कोणते पुस्तक वाचले तर त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होईल..? जास्त पण मोठी पुस्तक नको अशी नवीन वाचकाची इच्छा असते. म्हणुनच त्या सर्व नवीन आणि सर्व वाचकांसाठी असच एक मस्त आणि सुरस पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे.
जगप्रसिद्ध जपानी लेखक शिनइची होशी यांच्या लेखक नसीम बेडेकर यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या शिन्झन किस ह्या कथा संग्रहामधुन २१ सुरस कथा या पुस्तकामध्ये आहेत. लेखक शिनइची होशी हे जपानमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि सायन्स फिकशन लिहिणारे लेखक. शिनइची होशी ह्यांच्या लघु-लघु विज्ञानकथा आणि इतर लघु-लघु कथा या प्रसिद्ध आहेत. लघु-लघु कथा म्हणजे १-२ पानांच्या असतात. लेखक होशी यांच्या लघु-लघु कथा वाचकाला खुप छोट्या वाटतील पण त्या कथा जेव्हा संपतात तेव्हा त्या मोठा अर्थ मागे सोडतात. वाचकाला विचार करायला भाग पडतात. लेखक होशी यांनी मुलांसाठी लिहिलेल्या दीर्घ विज्ञानकथा अत्यंत मनोरंजक आहेत. लेखक निसीम बेडेकर यांनी लेखक होशी यांचा अनुवादित केलेला हा दुसरा कथा संग्रह आहे. अत्यंत सध्या भाषेत  सोप्या  शब्दात जपानी कथांचे मराठी अनुवाद केले आहे.सोप्या आणि नीटनेटक्या वाक्यांमुळे वाचक या पुस्तकाकडे ओढला जातो.
शिन्झन किस ह्या कथा संग्रहामध्ये एकुण २१ कथा आहेत. १८ लघु लघु कथा आणि ३ दीर्घकथा. वाचकाला या दीर्घकथा एका लघुकादंबरी प्रमाणे वाटतील. दीर्घकथा जरी मोठ्या असल्या तरी त्या वाचकाला त्याकडे ओढीनं धरतात. मग त्यामध्ये सजा-ए-मौत, परग्रहावरचे शर्विलक या दीर्घकथा मला खुप आवडल्या आणि त्यासोबतच सिंहाचा छावा,रागीट काका,युक्ती,शिन्झन किस या लघु-लघु कथांमधुन एक चांगला बोध मिळाला.
मी अशी अशा करतो की वाचकांना सुद्धा हा कथासंग्रह आवडेल आणि जे नवीन वाचक आहेत. ज्यांना पुस्तकं वाचावी असं वाटते त्या वाचकांनी या कथासंग्रहा पासुन त्यांच्या पुस्तक वाचनाला सुरवात केली तरी उत्तम सुरवात असेल. या कथासंग्रहाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. वाचकांना सर्वात उत्तम उत्तम पुस्तक वाचायला मिळावीत. त्यामुळे वाचक समृद्ध होईल अशी पुस्तके वाचकांना पर्यंत पोहचवण्याचे काम रोहन प्रकाशन अविरतपणे करत आहे. आणि सदैव करत राहोत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही हा कथासंग्रह असलाच पाहिजेल. जगप्रसिद्ध जपानी लेखक शिनइची होशी यांच्या २१ सुरस कथा शिन्झन किस अनुवाद लेखक निसीम बेडेकर.

श्रीजीवन तोंदले
www.pustakexpress.com 

1 comment:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.