मुळशी पॅटर्न
एका तालुक्याची नाही,अख्ख्या देशाची गोष्ट.....
सध्या मराठी सिनेमाचं वार जोरात सुरु
आहे मग ते आणि डॉ.काशिनाथ घाणेकर असो व नाळ या सोबतच लेखक दिग्दर्शक
प्रवीण तरडे दिग्दर्शीत मुळशी पॅटर्न.
प्रवीण तरडे म्हंटल कि सिनेमा कसा असेल
या विषयी चिंताच नाही कारण प्रवीण यांचे लिखाण आणि दिग्दर्शन हे आजूबाजूच्या परिस्तिथीला धरून आणि त्यांच्या समाज प्रबोधन
नजरेतुन सामाज्यामध्ये जे चालु आहे त्या विषयी ते उघडपणे भाष्य करतात. मग तो
सिनेमा देऊळबंद असो वा मुळशी पॅटर्न.सिनेमाला आकर्षक बनवलं आहे ते त्याच्या background Music ने आणि त्या सोबतच सिनेमाला खास बनवले
आहे ते महेश लिमये यांच्या उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीने. या आधीच्या सिनेमामधुन त्यांनी
आपल्या उत्तम सिनेमॅटोग्राफी ने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली आहे मग तो सिनेमा रेगे असो वा मुळशी पॅटर्न.
सिनेमा जरी बाहेरून गुंडगीरीवर भाष्य करणारा आहे
असे वाटत असेल तरी तो तसा नाही आहे. जेव्हा आपण प्रत्येक्ष हा सिनेमा पहाल तेव्हा
तो गैरसमज दुर होतो. उलट सिनेमा
शेतकऱ्यांच्या प्रत्येक विषयावर भाष्य करणारा आहे. मग तो त्यांच्या पिकाला
मिळालेला भाव असो वा त्यांच्या जमीनी कावडी मोलाने विकत घेतलेल्या. पण या सिनेमामधुन थोडं एक पाऊल पुढे
टाकुन शेत जमीन विकलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीची काय दशा होते यावर भाष्य केले आहे. डेव्हलपमेन्टच्या नावावर शेतकऱ्यांच्या
सोन्या सारख्या जमिनी कावडी मोलाने विकल्या गेल्या असो वा विस्थापनाच्या नावावर
शेतकऱ्यांची झालेली वाताहत या गोष्टीवर लेखक विश्वास पाटील यांनी
त्यांच्या झाडाझडती या कादंबरीतुन प्रकाश टाकलाच होता,पण आता लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे
मुळशी पॅटर्न या सिनेमामधून एक पाऊल पुढे जाऊन प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे.
डेव्हलपमेन्ट च्या नावावर शेतकऱ्यांकडुन जमिनी विकत घेतल्या. पण शेतकऱ्याला
मिळालेला पैसा कसा आणि कशा साठी वापरावा हेच सांगितलं गेलं नाही.मिळालेला पैस कसा
जपुन ठेवावा हे शेतकऱ्यांना समजलं नाही आलेला पैसे बघता बघता संपला आणि
मग.....त्या सोबतच सिनेमाचा शेवट सुद्धा हादरून टाकणारा आहे. सिनेमाच्या शेवट च
वाक्य विचार करायला भाग पडते.
सिनेमा मध्ये प्रवीण यांचे दिग्दर्शन
तर उत्तम झालेच आहे पण त्या सोबत त्यांनी केलेली नान्या भाई ही भुमिका बघण्या
सारखी आहे. सिनेमा मध्ये दिग्ज कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने सिनेमाला एक
वेगळाच इमोशनल टच दिला आहे. त्या मध्ये आवर्जून नाव घ्याव लागतात ते मोहन जोशी,सविता मालपेकर,महेश मांजरेकर,उपेंद्र लिमये. या सोबत इतर कलाकारांचे
काम सुद्धा छान झाले आहे. सिनेमामध्ये अभिनेते मोहन जोशीं यांनी
साकारलेला पाटील आणि झाडाझडती या कादंबरीतील कुशराज हे आज आपल्याला प्रत्येक गावा गावात किंवा प्रत्येक शहरात कुठे तरी
वॉचमन म्हणून तर कुठे हमाल म्हणून अडगळीत पडलेला दिसेल.
सिनेमा मधील मुख्य नायक
जिंदगी विराट,फास्टर फेणे आणि काही web series मधुन आपल्या अभिनयाची छाप टाकणारा ओम भुटकर याच काम सुद्धा अप्रतिम
झाले आहे.ओम भुटकर एक उत्तम अभिनेता म्हणून आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात घर
करत आहे. मिळालेल्या संधीचं सोन करण्याचं सामर्थ्य त्याच्या मध्ये आहे हे त्याच्या
काम वरून दिसत आहे.
सध्या सिनेमामधील
"अरारारा...." या गाण्याने प्रेक्षकाना वेगळीच भुरळ घातली आहे.सध्या
सिनेमा जोरात सुरु आहे. फक्त शहरातूनच नव्हे तर लोक खेड्यातुन जवळच्या सिनेमागृहामध्ये
गर्दी करत आहेत. मराठी सिनेमाला आलेले हे सोन्याचे दिवस असेच येत राहोत आणि लेखक
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कडुन या सारखेच चांगले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येवोत हिच इच्छा.
सिनेमा फक्त प्रौडांसाठी आहे याची मला
खंत वाटली कारण सिनेमा मध्ये पॉकेट मधील गुंडाचा फोटो कचरा पेटीत टाकलेला सिन आहे.
हा सिन कशाबद्दल आहे हे समजून येते आणि तोच सिन प्रत्येक किशोरवयीन मुलांनी बघावा त्यातुनच पुढच्या पिढीला एक चांगला संदेश मिळेल आणि तो सिनेमा मधुन उत्तम
प्रकारे दिला आहे.
तुम्ही अजुनही मुळशी पॅटर्न हा सिनेमा पहिला नसेल तर लवकरात
लवकर हा सिनेमा बघा.
-श्रीजीवन तोंदले