Sunday, December 23, 2018

फेसाटी


                             
                                 
                                   फेसाटी

                                           नवनाथगोरे. 

काही लोक अशी असतात की त्यांच्या दिसण्या-वागण्या वरून अगदी त्यांच्या रहाणीमान आणि पोषाखा वरून ते कोण आहेत हे आपल्याला समजत नसत.आजच्या काळामध्ये आपण माणसं एखाद्या व्यक्तीच्या पोषाखा वरून त्याच्या रहाणीमाना वरून त्याच्या विषयी आपल मत लगेच बनवुन बसतो आणि असच काही माझ्या विषयी झालं. मी अश्याच एका व्यक्तीला भेटलो. ती व्यक्ती रहाणीमानाने एकदम साधी त्या व्यक्तीकडे या आधुनिक जगातलं काही असेल तर तो त्यांचा मोबाईल. कष्ट आणि संघर्ष यातून स्वतःला सिद्ध करून उभारणारी ती व्यक्ती म्हणजे लेखक नवनाथ गोरे.लेखक गोरे यांच्याशी एका कार्यक्रमाच्या निमित्य भेट झाली.अत्यंत साधा माणूस, कपडेही साधे, भाषा पश्चिम महाराष्ट्राकडचीच; अहो एवढंच काय मी त्यांच्या पुस्तकांवर त्याची सही घेण्यासाठी गेलो तर ती हि साधी. उगाच लांब लचक भारी वगैरे असं काही नाही. त्यांचा सही करण्याच साधे पण म्हणजे सही करून त्या खाली त्या दिवशीची तारीख सुद्धा लिहिली.
कादंबरीचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. एक मेंढपाळ त्याच्या शेळ्यांसोबत दूरवरच्या घराकडे बघत उभा आहे. त्याच्या कपड्या वरून त्याचे कष्टी जीवनाचा अंदाज येतो डोक्यावरच आभाळ निळे आणि शांत आहे. आजूबाजूला लांबवर पसरलेले मोकळं शांत रान आहे. जणू त्या रानावर पाण्याचा टिपूस सुद्धा नाही आहे. 
 लेखक नवनाथ गोरे यांच्या जन्मापासून ते त्यांच्या M.A शिक्षणा पर्यंतचा प्रवास या कादंबरी मध्ये दिला आहे. घरी अठराविश्वे दारिद्रय,उपासमार यासोबतच लेखकाच्या आई वडिलांची तीव्र इच्छा असती कि त्यांच्या मुलाने नाथाने शिक्षण घ्यावे. या दलदलीच्या आयुष्यातून बाहेर काढावे.लेखक गोरे यांना शिक्षणाचे ओढ नव्हती. घरी उपासमार तर होतीच त्यासोबतच देणेकऱ्यांचे दुष्टचक्र घराच्या अवतीभोवती होते.गाय घेण्यासाठी घेतलेले सहा हजाराचे कर्ज ते हळूहळू दि लाखावर जाते. ते कर्ज फेडण्यासाठी जमीन विकावी लागती,तरी ते कर्ज काही फिटत नाही आणि घरच्या भोवतीचे कर्जाचे दुष्टचक्र फिरतच रहाते.
लेखकाची मोठी बहीण हिराबाई हीचा सासुरवासाने झालेला दुर्दैवी अंत आणि त्यासोबतच लेखकाच्या घरावर आलेली दुःखाची कळा हे सर्व वाचत असताना मनाला तीव्र वेदना होतात. लेखकाच्या घरावर एकामागुन एक संकट येतच असतात आणि त्यासोबत लेखकाला होणारे एकामागोमाग एक आजार.सदैव राबणारे लेखकाचे आईवडील,कधी कधी लेखकाच्या आईला कोरभर भाकर सुद्धा खायला मिळायची नाही. स्वतः उपाशी राहून मुलांच्या पोटाला खाऊ घालण्याची त्या माऊलीची धडपड वाचली की मन हळहळते. 
लेखकाचा हा प्रवास वाचत असताना पुस्तकांमधील एक गोष्ट मनाला स्पर्शून जाते. ती म्हणजे संगतगुण, लेखकाचा लहानपणीचा मित्र दगड्या याच्या संगतीत राहून लेखकाला गुटखा,तंबाकू खाण्याचे,दारू पिण्याचे व्यसन जडते. हे व्यसन इतके जडते कि खुद्द लेखक त्याच्या बारावीच्या इंग्रजीच्या पेपरला दारू पिऊन जातो. आणि दुसऱ्या बाजूला लेखकाचे मित्र बापू,विष्णू,संतोष,दिलीप,राजू हे लेखकाला जतला आपल्या रूम वर घेऊन येतात आणि जतमध्ये इंग्रजीच्या क्लासला ऍडमिशन घेऊन देतात आणि बारावीचा राहिलेला इंग्रजीचा विषय सोडविण्यासाठी मदत करतात.लेखकाच्या जतमधल्या प्रवासात एक वेगळीच घटना घडते. ती वाचली की मन हळहळते.
लेखकाचा हा सगळं खडतर प्रवास वाचताना मनाला अत्यंत वेदना होतात. लेखकाचा हा सर्व संघर्षमयी प्रवास वाचताना आणि शहरी जीवनात राहत असताना इथल्या सुखसोयीचा उपभोग घेत असताना खेड्यातील संघर्षमय जीवनाचा हेवा वाटतो. फेसाटी या कादंबरीतून लेखक नवनाथ गोरे यांचा संघर्षमय आयुष्यातून एक वेगळीच प्रेरणा मिळते. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक जरूर असलं पाहिजेल. प्रत्येकाने जरूर वाचावी अशी कादंबरी लेखक नवनाथ गोरे लिखित "फेसाटी

"फेसाटी याचा अर्थ म्हणजे त्रास,वेदना,दुःख असा जत तालुक्यात घेतला जातो. आणि प्रदेशानुसार बोली भाषा बदलते. प्रत्येक प्रदेशानुसार त्याचा अर्थही बदलतो". हा अर्थ मला खुद्द या कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी सांगितला आहे. आणि तो मी येथे तुमच्या समोर मांडला 

-       श्रीजीवन तोंदले.

Sunday, December 16, 2018

Driven The Virat Kohli Story Book Review


Driven The Virat Kohli Story
                                                    -Vijay Lokapally


Hello friends, today I am going to tell you about a book. The book will introduce you to a person in a different way. Then person is known as short tempered, abusive and impatient. But this book erases his image and creates a Passionate and aggressive one. The person is Captain of all formats of Indian Cricket team Virat Kohli.
                   The book narrates virat’s journey from 1st class cricket carrier to 2016 International carrier. The author narrating the journey is renowned sports journalist, Critic Mr. Vijay Lokapally. Mr. Lokapally has experienced the journey of Indian cricket very closely and wrote the same time to time. He also has written a book on the carrier of star batsman Virendra Sehwag.
                    Driven the Virat Kohli story consist the cover showing Virat’s photo playing a straight drive shot. The book with 221 pages starts in 1998 when virat’s father Prem Kohli sent him to west Delhi Cricket Academy to learn Playing cricket. Reason being Sachin Tendulkar’s fantastic batting against the Australia in Coca Cola Cup in the same year. The book consists Virat’s carrier got Decorated Step by step i.e.  Junior career, one day cricket Debut,Test Debut, IPL Journey, Leadership Etc.
                    Father Prem Kohli’s death was the turning point in Virat’s Life. After his death Virat really got transformed from boy to a man. We get so close to Virat while reading this book. The book also narrates some of his failures. How he faced them and encountered them and made come back. The whole story is so inspiring. The book also tells us about famous players in cricketing world and through some chapter we recall some of the old memories players in cricket.
                   The book is truly inspirational. Seeking cricket as carrier option can be very much guided by this book. The book is absolutely collectible for everyone.Driven The Virat Kohli Story


-     -  Shrijeevan Tondale

Sunday, December 9, 2018

चेटकीण


                    
               


                                 चेटकीण
                                                             - नारायण धारप

नमस्कार मित्रहो आज रविवार मी तुम्हाला एका रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेल्या कादंबरी विषयी सांगणार आहे. रहस्यमय आणि गूढ लेखन म्हंटल कि त्यांचं नाव अव्वल स्थानी येते. माझ्या पिढीला त्यांचं नाव नवीन असले तरी अशा लिखाणानी त्यांनी एक काळ गाजवला होता.मला पूर्ण खात्री आहे कि माझ्या पिढीला सुद्धा त्यांच्या रहस्यमय आणि गूढ लिखाणाची ओढ लागेल.मी असं हि ऐकलं आहे कि ज्या काळामध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चालत नव्हती  तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या लेखनाची आतुरतेने वाट बघायचा.रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणी द्वारे शेवट पर्यंत खेळवत ठेवणारे  लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप(सर).
नारायण धारप(सर) यांच्या अशाच रहस्यमय आणि गूढ कादंबरी मधील एक कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती म्हणजे चेटकीण. या कादंबरीची पहिली आवृत्ती २००२ मध्ये प्रकाशीत झाली आणि त्यानंतर या कादंबरीने वाचकांना अक्षरश्या वेढ लावले. कादंबरीच्या मुखपृष्ठावर लाल अक्षरामध्ये चेटकीण लिहिलं आहे.एक खिडकी आहे आणि त्या खिडकी मधुन एक जुने घर दिसते. कादंबरीचे मुखपृष्ठ संतुक गोळेगावकर यांनी साकारलेले आहे.
कादंबरी २०८ पानांची आहे. एकदा वाचायला सुरवात केली की ती हातातुन सोडवत नाही. मी तर हि कादंबरी एका रात्रीत वाचून काढली आहे. मनाला आदिम उत्कंठा लावणारी अशी हि कादंबरी. कादंबरीची सुरुवात होते ती कथेची नायिका सोनाली अमेरिकेहून भारतामध्ये परत येते. सोनालीच्या आजीच्या मृत्यू नंतर पुढच्या विधीसाठी दांडेकर कुटुंबीय त्यांच्या वाडीवर जातात. दांडेकरांचीवाडी गजबजलेल्या वस्ती पासुन अगदी दूर त्या दोन वस्तुंना घेऊन एका कोपऱ्यात असल्या सारखी. खुप वर्षांनी सोनाली अमेरिकेहून परत आलेली असते.वाडीवर तर ती पहिल्यांदाच आलेली असते.वाडी वरच्या आजूबाजूच्या परिसराविषयी तिला ओढ निर्माण होते. तिला जास्त कुतूहल आणि उत्कंठा वाटते ती त्या बंद वास्तू विषयी.त्या ओढीमुळेच ती वाडीचा आणि त्या बंद वास्तूचा इतिहास जाणुन घेते. त्या वास्तू मध्ये एक पिशाच्च शक्ती बंद आहे. काही लोक त्या शक्तीचे शिकार होतात तर काही त्या शक्ती पासुन अगदी सुखरूप परत येतात.मानवाला काही गोष्टी म्हणजे काही आजार काही सवयी त्या त्याला त्याच्या अनुवंशिकतेमुळे मिळतात.या गोष्टी मध्ये त्याच अनुवंशिक गुणधर्माने सोनालीला त्या बंद वास्तूमधील पिशाच्च शक्ती दिसत असते.चित्तथरारक,रोमहर्षक,अकल्पित,गूढतेची एखाद्या भयपटाला शोभावी अशी हि गोष्ट. लेखकाने इतक्या उत्तम प्रकारे मांडली आहे की कादंबरी वाचकाला तिच्याकडे ओढून धरते. हीच तर लेखन नारायण धारप यांच्या लेखनाची  खासियत आहे जी वाचकाला अक्षरशः वेड लावते.
कादंबरीचे प्रकाशन साकेत प्रकाशनने केले आहे. कादंबरी शेवट पर्यंत वाचकाला धरून ठेवते. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायला हवेच.भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड ठेवणाऱ्यांसाठी. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी हि कादंबरी लेखन नारायण धारप लिखित चेटकीण.

-          -   श्रीजीवन तोंदले
     
     पुस्तक- चेटकीण
लेखक-नारायण धारप
पृष्ठसंख्या-२०८
मूल्य-२५०