Sunday, March 17, 2019

शितू



शितू

लेखक - गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर

एका लेखकासाठी आपले लिखाण. आणि त्या लिखाणातुन साकार झालेली कलाकृती ही त्यांच्या मनाच्या अगदी जवळ असते. एखादा लेखक आपल्या विचाराने, समाजामध्ये उध्दभवणाऱ्या परिस्थितीमधून विचार करून एखादी कथा,कादंबरी लिहितो म्हणजे त्याच्या साठी एका आपत्याला जन्म देण्यासाखेच असते. आणि त्या कथेतील एखादी व्यक्तिरेखा त्या लेखकाच्या जवळची असेल तर...? जणु त्या व्यक्तिरेखेवर त्यांनी पोटच्या मुली सारखं प्रेम केले असेल तर..?
नमस्कार मित्रहो आज एक अशी कादंबरी घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. जी लेखकाच्या अत्यंत जवळची आहे.जणू त्यांची पोटची पोरच. त्यांनी जेव्हा ही कादंबरी वाचकांच्या हाती सोपवली तेव्हा असं वाटत होतं कि जणु ते आपल्या पोटच्या पोरीची पाठवणीच करत आहेत.कोकण कन्येची कथा सांगणारी कादंबरी म्हणजे गो.नी.दाण्डेकर (गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर) लिखित शितू.
अत्यंत मृदू आणि खुपच प्रेमळ कथा जी वाचते वेळी वाचकाचे मन सुद्धा प्रेमळ होऊन जाते. कथेची पार्श्वभुमी कोकणातील आहे. कोकणातल्या खाडीपट्च्या निसर्गाचे वर्णन लेखकानी खुपच छान पद्धतीने केले आहे. ते वाचते वेळी वाचकाच्या नजरेसमोर खाडीपाटचा कोकण उभा रहातो. कैऱ्यांची कलमे,काजूच्या बोंडांची धुंद गंध,मुळापासून वाढलेले फणस,कोकमांची नीटस,जांभळं,करवंदी,नारळी,फोपळी,सुपारी,शहाळी,बावीमध्ये साठणारं पाणी अहा...हा..हा  नजरे समोर कोकणच उभारहातो.
अशा या हिरव्यागार कोकणामध्ये बहरते एक सुंदर प्रेम कथा.वेळेश्वर गावचे खोत म्हणजेच अप्पा खोत. अप्पा हे गावचे खोत जणु ते संपुर्ण वेळशीचे भुपतीच. सारा गाव त्यांच्या कडे बापाच्या नजरेने बघायचा. कोणच्या घरी काय कमी पडले तरी स्वतःच्या घरच देणारे. चिंगल्याचं घर जाळले तेव्हा त्या आगीत उडी घेऊन चिंगल्याच्या म्हातारीला वाचवतात आणि घर उभं करायला मदतही करत. अप्पा जन्मताच हे सर्व दातृत्वाचे कवच अंगावर घेऊन आले. असे हे आप्पा. अप्पांची पत्नी लहान मुलाच्या बाळंतपणातच गेल्या.
आप्पांचा लहान मुलगा विसू महा खोडकर, संपुर्ण गाव त्याच्या खोड्यानी हैराण झाले पण आप्पा खोतांच पोर म्हणुन गाव त्याच्या कडे दुर्लक्ष करी. पण विसू सुद्धा अप्पांसारखाच प्रेमळ आणि जवाबदारी घेणारा. आप्पानी संपुर्ण गावाचे पालकत्व घेतले.त्यामध्ये त्यांनी एका बालविधवा मुलीला, जिचा जन्मदाताच तिचा जीवघेत होता त्याच्या तावडीतुन सोडवुन आपल्या घरी आणले. आप्पानी कुळवाड्याच्या शितूला ब्राम्हणाच्या घरचे संस्कार, रीतीभाती शिकवले. अगदी स्तोत्र सुद्धा.
समवयीन असणारे शितू आणि विसू यांच्या मध्ये एक वेगळच नाते निर्माण होते. एक अनामिक प्रेमाचे नाते त्यांच्या मध्ये निर्माण होते. शितूची काळजी घेणे तिचे रक्षण करणे हे विसूचे कर्तव्य बनते. तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट विसू मानत असे.या प्रेमामध्ये  विरहप्रेम सुद्धा आहे. ज्याने प्रेमाची वेगळीच परिभाष समजते. अशा सुंदर कथे मध्ये एक वादळ येतं.विसू आणि शितू यांच्या मध्ये बाहेरून आलेली प्रीती जेव्हा संस्कार आणि समाजाच्या भीती ने दुभंगते तेव्हा वाचकाचे मन पिळवटुन जाते.
कादंबरीमध्ये प्रसंगानुरूप छोटी छोटी रेखाचित्रे आहेत.ही रेखाचित्रे दीनानाथ दलाल यांनी रेखाटली आहेत. त्यामुळे कादंबरी वाचण्यामध्ये अधिक रस निर्माण होतो.वाचक कादंबरीकडे ओढला जातो ते म्हणजे गो.नी.दाण्डेकर यांच्या लेखणीने. खुप सुंदर प्रकारे सभोवतालच्या परिसराचे वर्णन असो व उध्दभवणाऱ्या परिस्थितीचे गांभीर्य यामुळे वाचकाच्या हातामधुन  कादंबरी सोडवत नाही. कादंबरीची भाषा कोकणातील आहे. कादंबरीचे प्रकाशन मृण्मयी प्रकाशनने केले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ रविमुकुल यांनी केले आहे. अत्यंत सुंदर असणारी ही कादंबरी प्रत्त्येक वाचकाच्या संग्रही असलीच पाहिजेल. लहानां पासुन मोठ्यांपर्यंत सर्वानी ही वाचलीच पाहिजेल अशी कादंबरी लेखक गो.नी.दाण्डेकर (गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर) लिखित शितू.

धन्यवाद. 


श्रीजीवन तोंदले

4 comments:

  1. Nice blog shri, will happy to read this book.

    ReplyDelete
  2. खूप छान असेच वाचत राहा आणि लिहीत राहा

    ReplyDelete
    Replies
    1. आपले मार्गदर्शन सदैव राहु दे

      Delete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.