Sunday, March 31, 2019

काळेकरडे स्ट्रोक्स.


काळेकरडे स्ट्रोक्स

           

                                                          लेखक - प्रणव सखदेव

 

आज काल कोणाचेच आयुष्य साधे सरळ नसते. कधी चढ-उतार, कधी सुख-दुःख,कधी यश-अपयश,कधी आनंद,कधी रोमांच आणि कधी कधी तर संपुर्ण गोंधळ. हा गोंधळ इतका की एखादा हे असे आयुष्य बघुन स्वतःच गोंधळात पडावा आणि आपसुक म्हणावा की  कोणाचे आयुष्य इतकं गोंधळ पुर्ण असु शकते..? हा गोंधळ पण कसा तर एका मध्ये एक गुणतत जाणारा...? पण किती ही गोंधळ,दुःख,संकटे असली तरी माणुस त्यावर मात करून आपले आयुष्य परत सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोच आणि सुरळीत बनवतो.

आज असेच एक पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. सध्या वाचकांच्या मनाला या कादंबरीने अक्षरशः वेढ लावले आहे. ती म्हणजे लेखक, कवी प्रणव सखदेव लिखित 'काळेकरडे स्ट्रोक्स'. प्रणव सुखदेव यांची ही पहिलीच कादंबरी आहे. पण जेव्हा आपण ही वाचायला सुरवात करतो तेव्हा ती आपल्याला तिच्याकडे घट्ट ओढुन घेते. आणि यामुळे लेखकाची ही पहिली कादंबरी आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत विचारपुर्वक, प्रत्येक घटनांचा, प्रसंगाचा वापर अत्यंत योग्य प्रकारे केला आहे. एखाद्या हिंदी चित्रपटापेक्षा सरस कथानक आहे. कथा जरी २०१० ते २०१२ दरम्यानची असली तरी कादंबरीमध्ये आजच्या तरुण पिढीची भाषा आहे. ज्याकाळामध्ये  wtsapp, face book ही माध्यम नव्हती. कॅल्लिंग रेट जास्त होते त्यामुळे लोक SMS वर अवलंबुन होते. विशेषतः महाविद्यालयीन तरुण-तरुणी . कादंबरीमध्ये तरुणाईचे आजच्या बोली भाषेतील शब्द आहेत.उदा. चुतीयाटिक,चुतिया,चुतड,फक हे आणि बरेच काही.    

कथेचा नायक समीर हा १९ ते २१ वयो गटातील युवक आहे. त्याच्या आयुष्यामध्ये घडणारे प्रसंग आणि त्यामुळे उध्दभवणारी परिस्थिती यामुळे वाचक विचारत पडेल की एखाद्याचे आयुष्य इतक्या गोंधळणी भरलेल असु शकते..? प्रत्येक महाविद्यालयी तरुण या वयात काहीतरी वेगळच करण्याच्या नादात असतो कारण ते वय ही तसेच असते. या वयामध्ये काही चांगल्या सवयी लागतात तर काही वाईट वेसने ही जडतात. अतरंगी सवयी,वेसने यावयात मुलांना लागतातच.

कादंबरीची सुरवात फ्लॅशबॅकने होते. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेऊन चांगली नोकरी करून अमेरिकेला जावे. चांगले शिक्षण म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनीर असे. पण मुळातच बंडखोर स्वभावाचा समीर त्याला काही तरी आऊट ऑफ बॉक्स जाऊन करायचं आहे.  आपल्या घरच्यांचा विरोध पत्करून मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये आर्टस् घेऊन मॅस्कॉमला प्रवेश घेतो. कारण त्याला फिलीम मेकिंग मध्ये करियर करायचं आहे.  कॉलेज मधील ब्लाईंड सेल मधील विध्यार्थ्यांसाठी काम करते वेळी त्याची भेट चैतन्य या अंध विद्यार्थ्यांशी आणि त्याची प्रियासी सोनाली यांच्याशी त्याची मैत्री होते. चैतन्य हा डोळ्यांनी जरी अंध असला तरी आयुष्याकडे डोळस पणे पाहण्याची दृष्टी त्याच्या कडे आहे. पुढे चैतन्यच्या अपघाती मृत्युमुळे सानिका आणि समीर यांच्या आयुष्यामध्ये एक अनामिक वादळ येते. इथेच कादंबरीचा पहिला chapter समाप्त होतो.

 चैतन्याच्या मृत्युनंतर समीर आणि सोनाली यादोघांचे आयुष्य भरकटून जाते. एका घटनेमुळे सोनाली ही समीर पासुन दुरावते ती कायमची. पुढे समीरच्या आयुष्यामध्ये खुप लोक येतात.अरुण,सलोनी,दादुकाका. अरुण म्हणजे सगळ्या वेसनांमधील बापा माणुस. अरुणही समीर सारखाच बंडखोर घरच्या पासुन दुर रहाणार. अरुणची आयुष्याकडे बघण्याची याख्या थोडी वेगळी आहे. त्यासोबत दादूकाका हा वयस्कर आहे आणि त्याने आयुष्यामध्ये खुप पावसाळे पाहिले आहेत. अरुण आणि दादूकाका यांचा या कादंबरीमध्ये एक तत्वज्ञानी वाटा आहे. सलोनी ही समीरच्या आयुष्यामध्ये काही वेगळाच वळण घेऊन येते. तिच्या सोबत तो एक साधे सरळ आयुष्य जगत असतोच पण  एक वेगळंच वादळ येते आणि त्यामध्ये दोघांचे आयुष्य उध्वस्थ होऊन जाते.

 असे म्हणतात मनुष्याचे आयुष्य, त्याचा जीवन प्रवास जिथुन सुरु होते तो तिथेच येऊन थांबतो आणि समाप्तही होतो. तसेच कादंबरीची कथा रुईया कॉलेजच्या कट्ट्या पासुन सुरु होते आणि तिथेच येऊन थांबते. पुर्ण होते. कादंबरीचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. कादंबरीची भाषा आणि अक्षर जुळवणी अत्यंत सुटसुटीत आहे. त्यामुळे वाचनामध्ये गोडी निर्माण होते. कादंबरीचे मुखपृष्ठ अन्वर हुसे यांनी अत्यंत शोधक पद्धतीने केले आहे. कथे मधील प्रत्येक व्यक्ती या मुखपृष्ठावर आहेत. मुळशी खोऱ्यातील औदुंबर सुद्धा. हे मुखपृष्ठ वाचकांना कादंबरीकडे आकर्षीत करते. प्रत्येक वाचकाच्या संग्रही ही कादंबरी असावी आणि  प्रत्येक वाचकाने जरूर वाचली पाहिजेल अशी  कादंबरी  प्रणव सखदेव लिखित काळेकरडे स्ट्रोक्स.

 

 जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा -

https://rohanprakashan.com/product/kalekarde-strokes/

रोहन प्रकाशन यांच्या इतर दर्जेदार पुस्तकांसाठी आणि माहितीसाठी  click करा.

3 comments:

  1. खूप छान उत्कंठावर्धक आहे

    ReplyDelete
  2. श्रीजीवन... तुझे सगळेच पुस्तक परिचय छान असतात..
    आणि तुझे हे पुस्तक परिचय वाचून बऱ्याच पुस्तकांबद्दल माहिती मिळतेय..त्यामुळे माझ्याकडच्या पुस्तकांचा आकडा पण वाढत जातोय...

    धन्यवाद...

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.