रॉ(भारताच्या गुप्ताचरसंस्थेची गूढगाथा)
लेखक - रवि आमले
प्रत्येक
युद्ध हे युद्ध भूमीवरच लढल जात असं नसत कारण काही युद्ध ही शत्रूशी समोरासमोर न
लढताही जिंकता येतात. जगाच्या इतिहासामध्ये अशा किती तरी लढाया झाल्या आहेत. एका राजाचे राज्य हे केव्हा बलाढ्य होते किंवा
त्याची संरक्षण यंत्रणा ही केव्हा बळकट,अभ्यद्य मानली जाते..? जेव्हा त्याची गुप्तचर यंत्रणा अत्यंत प्रभावी असते तेव्हा. जेव्हा ती शत्रूच्या गोटात शिरून शत्रूची
सर्व माहिती मिळवते,
शत्रूच्या राज्यात राहणारी प्रजा आणि त्या प्रजेमध्ये त्या
राज्याशी नाराज असलेल्या अशा लोकांना आपल्या बाजूने वळवून, शत्रूला गाफील ठेऊन त्याच्यावर मात करते, आपल्या सैनिकांचे एक थेंबही रक्त न सांडता शत्रू वर विजय मिळवते तेव्हा. अशा हेरगिरीचा इतिहास आणि अशा एक हेर म्हणजेच गुप्तचर संस्थेची गाथा
सांगणारे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे.
नमस्कार
मित्रहो, मला आवर्जून सांगावेसे वाटेल की हे एक असे पुस्तक आहे, जे प्रत्येक भारतीयाने वाचलेच पाहिजे. हे पुस्तक गाथा सांगत आहे
त्या सर्व पडद्यामागच्या लोकांची जे कधी प्रत्यक्षात समोर आले नाही पण त्यांचे योगदान आपल्या देशसाठी अतुलनीय आहे
आणि कायम राहील. लेखक रवि आमले यांनी
लिहिलेली 'भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा रॉ' हे ते पुस्तक. रॉ म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस. या गुप्तचरसंस्थेची तिच्या जन्मापासून ते आजच्या वर्तमानापर्यंतची संपूर्ण कहाणी लेखकाने या पुस्तकाद्वारे
मांडली आहे. सुरूवातीच्या प्रस्तावनेमध्ये लेखकाने म्हंटलंच आहे की, तस बघायला गेलं तर ही 'रॉ' ची बखरच आहे. या संस्थेचा इतिहास वाचकांसमोर
मांडताना त्या संदर्भांतील ठोस पुरावे, कागदपत्रे यांच्या आधार घेणे हे लेखकासाठी जरुरीचे होते परंतु ते मिळविणे महाकठीण
काम होते.
जे लेखक रवि आमले यांनी अत्यंत उत्तम प्रकारे केले आहे. कारण एवढ्या मोठ्या संस्थेची गाथा जी संस्थाशत्रूच्या गोटात जाऊन गोपनीय माहिती मिळवते, शत्रूला सुगावा लागायच्या आत आपले इच्छित साध्य करते, अशा संस्थेचा इतिहास लेखकाने संशोधक पद्धतीने मांडला आहे. त्यासोबतच ही
सर्व माहिती पुस्तकामध्ये मांडताना, ज्या घटना अजूनही रहस्यमय आहेत किंवा
ज्यावर उघडपणे बोलता येणार नाही, त्या सर्व घटना अत्यंत सावधगिरीने मांडण्याची खबरदारी लेखकाने घेतलेली आहे.
त्याबद्दल लेखकाचे आवर्जून कौतुक करावेसे वाटते.
रॉ विषयी जाणून घेण्याआधी लेखकाने इतिहासकाळापासून चालत आलेली भारतीय गुप्तचर यंत्रणांवर 'हेरगिरी इतिहासाच्या
पानातून' या प्रकरणाद्वारे प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये
महाभारतामधील हेरसंस्था, कौटल्यानीती यापासून ते थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी
जाधव-नाईक यांच्या पर्यंतचा सर्व अभ्यास लेखकाने मांडला आहे. 'रॉ' चा जन्म २१ सप्टेंबर १९६८ साली झाला. आणि त्याच्या जनक इंदिरा गांधी या होत्या. तेव्हा तिचे पहिले प्रमुख होते, रामेश्वरनाथ काव. अत्यंत हुशार आणि दूरदृष्टी असणारे रामेश्वरनाथ काव यांनी रॉ या संस्थेला इतर देशांच्या गुप्तचर संस्थांच्या धर्तीवर मानाचे
स्थान प्राप्त करून दिले आहे. २९३ पानाच्या या पुस्तकामध्ये तब्बल २४
प्रकरणाद्वारे लेखकाने रॉ च्या सर्व कामगिरीची माहिती मांडली
आहे. ही सर्व कहाणी वाचल्या नंतर या संस्थेचा अभिमान वाटतो. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या शत्रूला गाफील ठेऊन, त्याच्याच गोटातील काही व्यक्तींना
फोडून आपल्या बाजूने वळवणे यामध्ये रॉ चा खरा हातखंडा आहे.
या सोबतच इंदिरा गांधी भारताच्या
पंतप्रधान असताना आपल्या भाषणात "आपल्या देशामध्ये घडणाऱ्या चुकीच्या
गोष्टींमध्ये परकीय शक्तींचा हात आहे"
अशा अर्थाची विधाने करत असत. त्यांच्या या विधानांची विरोधक टिंगल उडवत असत,
पण परकीय शक्ती म्हणजे म्हणजे नक्की
कोण याचे स्पष्टीकरणसुद्धा लेखकाने समर्पकरित्या दिले आहे. या पुस्तकामधून गुप्तचर
यंत्रणांमधील छोट्या-मोठ्या संज्ञा आणि त्यांचे
अर्थ सुद्धा लेखकाने दिले आहेत. त्यासोबत पुस्तकाच्या शेवटी लेखकाने संदर्भ लेखांची माहिती दिली आहे, यावरून समजून येते की लेखक रवि आमले यांनी हे पुस्तक किती अभ्यासपूर्वक लिहिले आहे.
पुस्तकाचे प्रकाशन मनोविकास प्रकाशन
यांनी केले आहे. पुस्तकांचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अत्यंत समर्पक
पद्धतीचे केले आहे. भारतीय गुप्तचरसंस्थेचा पडद्या मागचा इतिहास जाणून घेण्यासाठी
प्रत्यकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक लेखक रवि आमले
लिखित 'रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा'.
श्रीजीवन तोंदले
वाचनीय लेख!!
ReplyDeleteधन्यवाद. माझ्या ब्लॉग वरील इतर पुस्तकांचे पुस्तक परिचय जरूर वाचा
Deleteवा छान वाचनीय आहे.
ReplyDeleteधन्यवाद अनिल जी माझ्या ब्लॉग वरील इतर पुस्तकांचे पुस्तक परिचय जरूर वाचा
Deleteधन्यवाद अनिल जी माझ्या ब्लॉग वरील इतर पुस्तकांचे पुस्तक परिचय जरूर वाचा
ReplyDelete