Sunday, October 14, 2018

रहस्यमय आणि गुढ


                                                 
                                               

                                                         दंशकाल

                           

                            लेखक - हृषीकेश  गुप्ते

 

 दंशकाल या कादंबरीकडे ओढलो त्याचं निमित्या म्हणजे रविवार दिनांक २६ ऑगस्ट पत्रकार भवन पुणे येथे झालेल्या या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाला मी गेलो होतो. कादंबरीचं उत्कृष्ट समीक्षण रेखा इनामदार-साने (मॅडम) यांनी केले आणि कादंबरी विषयी ओढ निर्माण झाली. कादंबरी मनामध्ये भरली त्याचे प्रमुख कारण म्हणजे अभिनेते कवी किशोर कदम (सौमित्र) यांनी कादंबरीच्या काही निवडक भागांचे अभिवाचन केले.

 मी काही असा मोठा वाचक नाही, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लेखक मला माहिती आहेत. खरं सांगायचं झालं तर हृषीकेश गुप्ते हे कोण आहेत हेच मला माहिती नव्हते. मग त्यांच्या विषयी काही माहिती असणं यात शंकाच नाही पण. प्रसन्न जोशी सर (वरिष्ठ निर्माता एबीपी माझा) यांनी या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्य लेखक हृषीकेश गुप्ते यांच्याशी मुक्त संवाद साधला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना हृषीकेश गुप्ते यांनी चांगल्या आणि विचार पूर्वक पद्धतीने उत्तरे दिली आणि यातून मला हृषीकेश गुप्ते समजले.

 आता थोडं या कादंबरी विषयी बोलतो, कादंबरीचं मुखपृष्ठ पाहताच या कादंबरी मध्ये काही तरी गुढ रहस्यमय आणि भयंकर असं काही तरी दडलं आहे असं वाटतं. विहिरीच्या कठड्यावर एक कावळा बसला आहे,विहिरीमध्ये एक दोर खाली जात आहे. दोरखंडाला लामना लटकत आहे. आणि त्या दोरखंडाला पकडून काही माणस वर येण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा लटकलेले आहेत. त्या सोबतच विहिरीच्या तळातुन एक भयंकर जीव सापासारख वाटणारा एक भयंकर जीव तो क्रूर हसत आहे, त्याची लाल जीभ बाहेर अली आहे, त्याच्या उघड्या तोंडातले दात खूपच तीक्ष्ण आहेत, त्याचे डोळे खुप भयंकर गूढ ते आपल्या कडेच पाहत आहेत. असं या कादंबरीचे मुखपृष्ठ. जसे हे मुखपृष्ठ आपल्याला तिच्या कडे ओढते तसेच या कादंबरीची कथा सुद्धा.

 कथेची सुरवात होते ती कोकणातुन, कथेचा नायक अनिरुद्ध त्याचा लहान काका त्याच्या भूगावच्या देशमुखांच्या वाड्याच्या दारात वेड लागलेल्या अवस्थेत येऊन उभा रहातो. कथेचा नायक अनिरुद्ध त्याची आई, अण्णा, नंदकाका, भानूकाका, रेवाकाकु, आत्या, यजमान, गार्गी या आणि इतर काही व्येक्तीच्या अवती भोवती ही कथा फिरत असते. कादंबरी जेव्हा वाचायला घेतली तेव्हा कादंबरी हातातून खाली ठेवूस वाटत नव्हती. आता पुढे काय होणार या उत्कंठेने चारशे वीस पानाची कादंबरी कधी संपली हे समजलेच नाही.

 लेखक हृषीकेश गुप्ते यांचे रंगाविषयी वेगळच नातं आहे असं वाटतं. प्रत्येक गोष्टीचं वर्णन करताना त्याच्या रंगासहित ते एक वेगळाच वर्णन करतात. मग ते सकाळच कोवळ ऊन असो वा रात्रीचा गडद अंधार, अगदी लेखकानं केलेलं वरण भाताचं रंगासहित उदाहरण, पिवळ वरण ,पांढरा भात याचा कालवल्या  नंतरचा होणार रंग याच केलेलं वर्णन काही वेगळच वाटत. त्या सोबत मांसाहाराचे केलेल वर्णन तोंडाला पाणी आणते. नायकाच्या वाड्यामध्ये ती एक अनामिक शक्ती अवतरते. तेव्हा त्या शक्तीच केलेल वर्णन, अगदी ती शक्ती अवतरते तेव्हा कापलेल्या बकऱ्याच्या मासाच्या वासाचे केलेले वर्णन. खरोखरच त्या मांसाचा वास नाकामध्ये येतो. त्या अनामिक शक्तीच वर्णन वाचताना मनामध्ये भीती निर्माण होते. वेड लागलेल्या भानू काकाला पुढे दत्ताचा अवतार मानून त्याच्या नावाचा मठ बांधून एक वेगळीच अंधश्रद्धा भूगावत सुरु होते आणि हीच अंधश्रद्धा पुढे देशमुखांचा काळ बनते. कादंबरीमध्ये वर्णन केल्या प्रमाणे नायकाच्या आईविषयी वाचताना मनात एक आई निर्माण होते. नायकच आई विषयी असलेलं प्रेम  कादंबरीत थोडं जास्त घेतलं आहे. विहिरीत पडलेल्या आईला बाहेर काढण्यासाठी नायक जेव्हा विहिरीत उडी मारतो तेव्हा केलेलं वर्णन डोळ्यासमोर येते. वेड लागलेला भानूकाका जेव्हा गावात येतो, तेव्हा त्याच्या सोबत त्याची तरुण पत्नी रेवा काकू पण येते. रेवा काकूंच्या सौदर्याविषयीच केलेल वर्णन मनाला भुरळ घालते.  समलैंगी असलेला नंदा काका त्याच्या ताकतीच वर्णन लेखकांनी खूप छान प्रकारे केलं आहे. फक्त गळा आवळून एखाद्याला मारणारा हा शक्तिशाली माणूस समलैंगिक आहे हे वाचताना आश्चर्य वाटत. नायकाची आजी, आत्या, आत्याचे यजमान आणि गावातल्या काही लोक मिळून भानूकाकाच्या वेडाच्या अंधश्रदेचा बाजार मांडतात. आणि याच बाजारीकरणामुळे देशमुखांची वाहताहत होते. आणि कादंबरीचा दुसरा भाग इथे संपतो.

 कादंबरी मध्ये वर्णन केलेल्या पत्त्यांच्या बंगल्या विषयी वाचताना. आपण स्वतःच मनात एक पत्ताच बंगला बांधतो. कादंबरीमध्ये लेखकाने लहान लहान गोष्टींचे केलेलं वर्णन मनाला मोहून नेत. मग ते उलट्या पंखाची कोंबडी सुपडी असो वा रोहा-दीवा लोकल प्रवास आणि त्याच्या पार्शवभूमी विषयी केलेलं वर्णन. मग नंतर नंतर याच छोट्या छोट्या गोष्टींचे वर्णन नको वाटतातउदा. नायकाने मलेशियाच्या मार्केट मधुन आणलेला सुरा.

कादंबरीचे प्रकाशन राजहंस प्रकाशन यांनी केले आहे. रहस्यमय आणि गुढ वाचण्याची ज्यांना आवड आहे अशा आणि इतर वाचकांनी जरूर वाचावी अशी हि कादंबरी लेखक हृषीकेश गुप्ते लिखेत दंशकाल.  

                                                   

-       श्रीजीवन तोंदले


11 comments:

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.