Sunday, February 3, 2019

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी Book Review by pustakexpress.com





     लेखक - शेषराव मोरे

या जगामध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्यांचं व्यक्तीमत्व,कार्य,कर्तुत्व सुर्या सारख तेजस्वी असते. पण काही लोकं त्यांच्या तेजस्वी कार्याला,कर्तुत्वाला बदमानीचे ग्रहण लावतात.पण ते बदमानीचे ग्रहण जास्तकाळ टिकत नाही. कारण त्या व्यक्तीच्या तेजा समोर ते टिकत नाही. मी आज त्या व्यक्तीविषयी बोलत आहे. ज्यांनी सत्तर वर्षे आपल्या शक्तीचा प्रत्येक बिंदु  देश सेवेसाठी व्यतीत केला. कवी, साहित्यिक, नाटकार,समाजसुधारक, क्रांतिकारक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव). अशा या तेजस्वी सुर्याला बदनामीचे ग्रहण खुप लोकांनी लावले आणि अजुन लावत आहेत. स्वा. सावरकरांच्या विरुद्ध बोलायचं म्हंटलं कि लोक अक्षरशा तुटुन पडतात. त्यांची बदनामी करणे तर त्या लोकांचा आवडीचा विषय. पण या बदनामीला जोरदार उत्तर देणार काही लोक आहेत. त्या लोकांमध्ये एक नाव आवर्जुन घेतला पाहिजे आणि व्यक्ती म्हणजे श्री. शेषराव मोरे (सर).
नमस्कार आज मी तुमच्या भेटीला एक असं पुस्तक घेऊन आलॊ आहे जे स्वा. सावरकर यांची सतत बदनामी करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल. त्यांचे डोळे कायमचे उघडण्याचे काम करेल. स्वा. सावरकर यांची बदनामी खुप वेगवेगळ्या पद्धतीने केली गेली आणि आजही ती केली जात आहे . मग ती माफीचा साक्षीदार सावरकर,संडासवीर सावरकर,पळपुटा सावरकर आणि या पेक्षा पुढे जाऊन कहर म्हणजे म .गांधींच्या हत्येच्याकटा मध्ये त्यांचा सहभाग होता. गांधी हत्या त्यांनीच करवली. गांधी हत्येचे खरे सूत्रधार स्वा. सावरकरच होते. या सारख्या विषयांद्वारे स्वा.सावरकरांची बदनामी करण्याचे काम सावरकर विरोधी लोकांनी केले आहे. पण लेखक श्री.शेषराव मोरे (सर) यांनी गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी या पुस्तकाद्वारे या सर्वा चर्चाना पुर्णविराम दिला आहे. 
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी या ३१४ पानांच्या पुस्तकामधुन आठ प्रकरणाद्वारे मा.गांधी यांची हत्या आणि त्यामध्ये स्वा. सावरकरांची केलेली बदनामी या विषयावर सर्वबाजुने चर्चा केली आहे. गांधीहत्या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार बनलेला दिगंबर बडवे याच्या साक्षी मधील त्रुटी, त्यावेळच्या दिल्ली पोलीस आणि मुबंई पोलीस याचा हलगर्जीपणा, कपूर आयोगा मधील उणीवा आणि विसंगती, यासोबत नथुरामच्या हुशार बुद्धिमतेचे आणि त्याच्या निर्णय क्षमतेविषयी केलेला विश्लेषण सुद्धा अगदी मुद्देसुदपणे लेखक श्री.मोरे यांनी या पुस्तकामध्ये मांडले आहे.पुस्तकाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन केले आहे. वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात. वाचकांच्या मनात त्यांचे स्थान सर्वात वरती आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे पुस्तकाच्या सुरवातीला हे पुस्तक लेखक श्री.मोरे यांनी  का लिहिले याबद्धलच त्यांचं राष्ट्रकर्तव्य काय आहे हे विचार त्यांनी उत्तम प्रकारे मांडले आहेत. आजच्या तरुणपिढी समोर सावरकरांच्या कार्याचा, त्यांच्या देशभक्तीचा,त्यांच्या मातृभूमीच्या प्रेमाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला आहे. तो जो खरा इतिहास आणि खरे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर कोण होते आणि त्यांची देशभक्ती कशी होती यासर्व गोष्टी लेखक श्री.मोरे आणि इतर लेखक करत आहेत.
अदिम राष्ट्रभक्ती, मातृभुमी विषयीच प्रेम काय आणि किती असते हे सावरकरांनी संपुर्ण जगाला दाखवले. पण काही लोकांनी या तेजस्वी सुर्याला बदनामीच्या ग्रहणाने झाकुन टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. छा. शिवाजी महाराज,छा. संभाजी महाराज यांच्या नंतर राष्ट्रभक्ती, मातृभुमीप्रेम हे काय असते हे स्वा. सावरकर यांचे चरित्र वाचल्यावर समजते. हा माणूस नव्हेच साक्षात परमेश्वराचा अवतारच. त्यांना विनम्र अभिवादन. या देशाला आणि जगाला राष्ट्रभक्ती, मातृभुमीप्रेम शिकवण्यासाठी तात्याराव तुम्ही परत या भुमीवर  जन्म घ्या.......
आजच्या तरुणपिढीने आवर्जुन हे पुस्तक वाचले पाहिजे. त्यासोबत सावरकर विरोधी लोकांनी तर सर्वात प्रथम वाचावे. प्रत्येक वाचक प्रेमींच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजे. लेखक श्री.शेषराव मोरे लिखित गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी.


श्रीजीवन तोंदले
www.pustakexpress.com

3 comments:

  1. अध्यात्मवाद : श्रद्धा की अंधश्रद्धा, लेखक- प्रा. य. ना. वालावलकर.
    या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया नक्की द्या. कोल्हापूर येथे करवीर वाचनालाय येथे प्रदर्शन सुरू आहे. तेथे पुस्तक उपलब्ध होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. अध्यात्मवाद : श्रद्धा की अंधश्रद्धा या पुस्तकाविषयी माझ्या blog वर मी जरूर लिहिन लवकरच

      Delete
  2. कृपया "स्वातंत्रवीर सावरकर" यांच्या "काळे पाणी" या पुस्तकाचा सारांश आणि प्रतिक्रिया द्या. आम्ही वाट बघतो आहोत. खूप छान अभिप्राय आहे तुमचा.

    ReplyDelete

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.