Tuesday, October 15, 2019

मला निसटलंच पाहिजे






मला निसटलंच पाहिजे

           निवेदन - सल्व्होमिर राविझ
                        शब्दांकन -रोनाल्ड डाउनिंग
                                       अनुवाद  - श्रीकांत लागू



या पृथ्वीवर मनुष्य प्राणी हा असा प्राणी आहे ज्याने एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्यासाठी योग्य योजना बनवली तर त्याची कधीच हार होत नाही. कधीही हार न मानता आपले ध्येय गाठण्याचे सामर्थ्य त्याच्या कडे असते. कारण त्याला एकच माहिती असते सतत प्रयत्न करत रहायचे. सतत सकारात्मक रहायचे.  मंडळी ते म्हणता ना अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. हो तसच काहीस सांगणारे पुस्तक घेऊन मी आज तुमच्या भेटीला आलो आहे. रोनाल्ड डाउनिंग यांच्या Long Walk या कथेचा अनुवाद लेखक श्रीकांत लागू यांनी मला निसटलंच पाहिजेल या पुस्तका द्वारे केले आहे. १२१ पानांचे हे पुस्तक  क्षणा क्षणाला उत्खणटता वाढवणारे आणि वाचकाला कथेशी एकरूप करणारे कथानक.

कथेचा काळ १९३९ च्या दरम्यानचा म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाचा.एखाद्या इंग्रजी सिनेमाला साजेसे कथानक. रशियाच्या स्टॅलिनच्या जुलमी राजवटीचा. या जुलमी राजवटीमधुन कोणाची सुटका झाली नाही. कामधंद्यामिनीत्त रशियामध्ये असलेल्या काही परदेशी नागरिकही त्या जुलमातुन सुटले नाही. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले. सल्व्होमिर रविझ हा २४ वर्षीय तरुण पोलिश लेफ्टनंट याला रशियन पोलिसांनी गुप्तहेर हेरगिरीच्या आरोपाखाली पकडून त्याला उत्तर सैबेरियातील एका तुरुंगात टाकले. इथुन कथेला सुरवात होते. पुढील २५ वर्ष आपल्याला या प्रचंड थंडीच्या आणि अमानुष जुलमी वातावरणात काढावी लागणार या विचारांनी सल्व्होमिर रविझ अस्वस्थ होतो. या गुलामगिरीतून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजेल, आपल्याला इथून निसटलच पाहिजेल असा विचार तो करतो आणि त्यानुसार तो योजना बनवतो. एकट्याने पलायन करणे सोपे नाही आणि नेमकं कोणत्या दिशेला ज्याचे याचा अंदाज सुद्धा त्याला नसतो. पलायनासाठी आपल्याला साथीदारांची गरज आहे.तंगड्या,ताकदवान, विश्वासु आणि या प्रचंड थंडी असणाऱ्या वातावरणामध्ये तग धरणारे हवेत. अशा साथीदारांचा तो त्या तुरुंगात शोध  घेतो. अत्यंत विचारपूर्वक पणे तो त्याच्या साथीदारांची निवड करत.  ऑनास्ताझी कोलमेनो,सिग्मंड मॅकोवस्की,पालुकोवीज,युजीन झारो,झकॉरियास,स्मिथ या सहा साथीदार मिळतात. तुरुंगामधून पळून जाण्याची योजना रविझ अत्यंत सावधपणे आणि काटेकोरपणे करतो. त्याच्या या पळून जाण्याच्या योजनेमध्ये तुरुंगाधिकाऱ्याची पत्नी सुद्धा त्याला मदत करते. ते सर्व सहाजण तुरुंगातुन पलायन करतात.

अशा पद्धतीने कथेचा दुसरभाग सुरु होतो.  कडाक्याच्या थंडी मध्ये ते सहा जण पलायन करतात. पण पुढच्या प्रवासमध्ये कोणती आव्हाने कोणत्या अडचणी या भयाण आणि गुढ वाटेवर काळ आपल्यासाठी घेऊन येतो आहे याची कल्पना त्यांना नसते. सुरवातीला गोठवुन टाकणारी थंडी मग गोबीचं महाकाय वाटणारा वाळवंट,तिबेटच्या मोठ मोठाल्या पर्वत रांगा आणि मग शेवटी हिमालय पार करून तब्बल ४००० मैलाचा पायी प्रवास करून शेवटी ते भारतामध्ये पोहचतात. पलायनाच्या त्या वाटे मध्ये त्यांना ख्रिस्तीना ही तरुणी भेटते. गोबीच्या भयान वाळवंटी मार्गामध्ये त्या सहा पुरुषानं सोबत त्यांच्या ताकतीने चालण्याचे तिचे धाडस वाचुन उर भरून येतो. सरते शेवटी या ४००० मैलाच्या वाटे मध्ये त्यांच्या पैकी काही मरण पावतात. त्यांचे झालेले मृत्यु मनाला चटका लाऊन जातात.रविझला  या  अत्यंत बिकट आणि खडतर प्रवासामध्ये सतत कोणी तरी आपल्या मागावर आहेत असे वाटत रहाते आणि ही भावना सुद्धा वाचकाच्या मनाला लागुन रहाते. शेवटी भारतामध्ये पोहचल्यावर  सल्व्होमिर रविझने व्येक्त केलेल्या भावना वाचते वेळी एक समाधानाची आणि विजयाची भावना वाचकाच्या मनात उतरते.

सरते शेवटी मला या पुस्तकाने काय शिकवले....? तर अत्यंत अनुकल परिस्थितीमध्ये आत्मविश्वास न गमावता स्वतःला उभ कसे करावे,कमीत कमी साधनांमध्ये मोठे लक्ष्य पुर्ण करायचे असेल तर त्याप्रमाणे योजना कशी बनवली पाहिजेल, कमीत कमी खाद्य पदार्थांमध्ये काटकसर कशी करावी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कधीही हार मानायची नाही. नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेल. कोणत्याही परिस्तिथीचा सामना करता आला पाहिजेल.

कादंबरीचे प्रकाशन राजहंस प्रकाशन ने केले आहे.राजहंस प्रकाशन म्हंटल कि त्या कादंबरी विषयी शंकाच नाही.राजहंस प्रकाशनाची अशी खूपच प्रसिद्ध झालेली पुस्तके आहेत उदा.एक होता कार्व्हर,पानिपत,एका तेलियाने,शोध या आणि किती तरी अशा प्रसिद्ध कादंबरीचं  प्रकाशन त्यांनी केले आहे. वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून ते सदैव प्रयत्नशील असतात आणि वाचकांच्या मनात त्यांचे स्थान सर्वात वरती आहे. मुखपृष्ठ आणि आतील मांडणी सतीश देशपांडे यांनी केले आहे. मनाची उत्कंठता वाढवणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या संग्रही असलेच पाहिजेल.



- श्रीजीवन तोंदले 

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.