४४० चंदनवाडी
लेखक
- नारायण धारप
नमस्कार मित्रहो आज मी तुम्हाला एका
रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेल्या कादंबरी विषयी सांगणार आहे. त्यांच्या
रहस्यमय आणि गूढ लेखनाने त्यानी वाचकांच्या मनावर वेगळीच भुरळ घातली आहे. आजच्या
पिढीला त्यांचं नाव नवीन असले तरी अशा लिखाणानी त्यांनी एक काळ गाजवला होता. मी असं
हि ऐकलं आहे कि ज्या काळामध्ये दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चालत
नव्हती तेव्हा सामान्य वाचक त्यांच्या
लेखनाची आतुरतेने वाट बघायचा. त्याच प्रमाणे मला पूर्ण खात्री आहे कि आजच्या सोसिअल मीडियाच्या पिढीला सुद्धा त्यांच्या
रहस्यमय आणि गूढ लिखाणाची ओढ लागेल. रहस्यमय आणि गूढ लेखनाच्या अव्वल स्थानी
असणारे आणि वाचकाला त्यांच्या लेखणी द्वारे शेवट पर्यंत खेळवत ठेवणारे लेखक म्हणजे आदरणीय नारायण धारप (सर).
नारायण धारप(सर) यांच्या अशाच रहस्यमय
आणि गूढ कादंबरी मधील एक कादंबरी मी आज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. ती
म्हणजे ४४० चंदनवाडी. मनाला आदिम उत्कंठा
लावणारी अशी ही कादंबरी १९८ पानांची आहे. नारायण धारप याच्या कादंबरीची सुरवात हि नेहमी वाचकांना आकर्षित करते.कारण सुरवातीलाच संकटाची किंवा त्या भयाण
गुढ शक्तीची थोडीशी ओळख करून दिली जाते, त्यामुळे वाचक सुरवाती पासुनच कादंबरीशी बांधला जातो. कादंबरीची
सुरुवात सुद्धा अशीच आहे. सदावर्ते कुटुंबीयांनी विकत घेतलेल्या ४४० चंदनवाडी ह्या
बंगल्यात ते रहायला आल्या पासुन त्यांच्या लहान मुलीला म्हणजेच सुनीताला विचित्र
आणि भयानक स्वप्न पडू लागतात. सदावर्ते सुनीताला डॉ.गौतम देशमाने यांच्या कडे घेऊन
जातात. मानसोपचार तंज्ञ असणारे डॉ. गौतम
यांना पहिल्याच भेटीमध्ये सुनीता सोबत काहीतरी विचित्र घडत आहे याची उखल होते. त्याप्रमाणे
ते सदावर्ते यांना काही दिवसांसाठी त्या बंगल्या पासुन दुर रहाण्याचा सल्ला देतात.
खुद्द सदावर्ते आणि डॉ. गौतम यांना सुद्धा त्या बंगल्यामधील स्वयंपाक घराच्या तळ
घरातील त्या भयानक आणि गुढ शक्तीचा अनुभव येतो. आणि इथुन कथेला सुरवात होते.
दोन स्वभावाची माणसं समाजामध्ये असतात, एक ते जे चाललं आहे ते चालु देणारी, गोष्टींकडे दुर्लक्ष करणारी आणि दुसरी
म्हणजे ती माणसं
जी जे ते चाललं आहे त्याचा
सामना करणारी गोष्टींच्या तळा पर्यंत जाणारी. डॉ.गौतम हे त्या दोन नंबरच्या
स्वभावातील व्यक्ती. ४४० चंदनवाडी बंगल्यामधील स्वयंपाक घराच्या तळ घरातील असणाऱ्या त्या भयानक शक्तीचं मुळ काय आणि अशी कोणती
घटना भुतकाळामध्ये घडली ज्याने ती शक्ती तेथे उदयास आली. अशा पद्धतीने गौतमचा शोध
सुरु होतो आणि कादंबरी वाचकाच्या नकळत त्याला तिच्या मुठी मध्ये घेत.
१९३२ मध्ये इनामदार यांनी त्याजागी
बांगला बांधला आणि तिथुन थेट २००३ पर्यंत चार ते पाच वर्षाच्या अंतराने तो बांगला
तब्बल १५ ते १६ वेळा विकला आणि खरेदी केला गेला. प्रत्येक मालकाला ती वास्तु फारशी
लाभदायी ठरली नाही. गौतम त्या प्रत्येक मालकांना भेटतो त्यांना आलेले त्या वास्तु मधील अनुभव जाणुन घेतो. गौतमने
घेतलेला हा शोध कादंबरीचा मुळ गाभा आहे आणि प्रत्येकाने जरूर वाचावा असा आहे. त्यातुनच गौतमला त्या भयाण आणि गुढ शक्तीची तीव्रता,
ताकद समजते. लेखक नारायण धारप यांच्या प्रत्येक
कादंबरीचे वैशिष्ठ म्हणजे प्रत्येक कथेमध्ये
असणाऱ्या त्या भयानक आणि गुढ शक्तीचे वर्णन हे वेगवेगळे असते. त्या शक्तीचे वर्णन वाचते वेळी किंवा कथेमध्ये त्या
भयानक शक्तीचे आगमन होणार क्षण वाचतेवेळी अंगावर काटा येतो. अशा प्रकारे लेखक
नारायण धारप हे वाचकाला त्यांच्या लेखनात गुंतुन ठेवतात.
आणि प्रत्येक क्षणाला पुढे काय होणार अशी उत्सुकता लागुन रहाते. पुढे कथेमध्ये कल्हार नावाचा मांत्रिक
आणि वज्रे नावाचे गुरुजी कथेमध्ये येतात. यादोघांना प्राप्त झालेल्या शक्तीचा
इतिहास लेखकाने उत्तम प्रकारे मांडला आहे. डॉ.गौतम आपल्या प्रघालंब बुद्धीच्या जोरावर आणि कल्हार आणि वज्रे
गुरुजी यांच्या मदतीने म्हणजेच मानसशक्तीचा,तंत्रशक्तीचा आणि मंत्रशक्तीचा वापरकरून त्या भयानक आणि गुढ शक्तीवर
विजय मिळवतो. या विजयासाठी त्याने केलेली मेहनत वाचनीय आहे. आधीच म्हंटल्या
प्रमाणे लेखक वाचकाला शेवट पर्यंत त्यांच्या लेखणी द्वारे अक्षरशः धरून ठेवतो.
या कादंबरी मधुन आपल्याला एक गोष्ट
प्रामुख्याने समजुन येते ती म्हणजे माणसाच्या प्रघाल्भ बुध्दिमतये पुढे आणि आदिम
इच्छा शक्ती समोर कोणत्याही असत्य, क्रुर शक्तीचा पराभव होतोच होतो.
कादंबरीचे प्रकाशन साकेत प्रकाशन
यांनी केले आहे. कादंबरी शेवट पर्यंत वाचकाला धरून ठेवते. प्रत्येकाच्या
संग्रही हे पुस्तक असायला हवेच. भय,गुढ,रोमहर्षक या विषयी वाचण्याची आवड
ठेवणाऱ्यांसाठी. प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी हि
कादंबरी लेखन नारायण धारप लिखित ४४० चंदनवाडी.
-
श्रीजीवन तोंदले
वाह वाह छान तोंदले जी 🙏🙏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteवाह वाह छान उस्तुकता वाचना ची
ReplyDeleteधन्यवाद, नक्की वाचा आणि तुमच्या संग्रही ठेवा
Deleteछान उत्सुकता वाटतेय
ReplyDeleteनक्की वाचा आणि तुमच्या संग्रही ठेवा
Deleteचेटकीण...,
ReplyDeleteमोहिनी...,
बहुरूपी...,
चंद्राची सावली...,
काळी जोशी..., आणि
फ्रँकेन्स्टाइन... ही धाराप सरांची पुस्तके वाचली आहेत आणि... ४४० चंदनवाडी ह्या पुस्तकाचा संक्षिप्त सारांश वाचून हे पुस्तक देखील सरांच्या बाकी सर्व पुस्तकां प्रमाणे आपल्या प्रत्येक पानावर खिळवून ठेवणारे असणार यात तीळ मात्र ही शंका नाही...
होय नारायण धारप सरांच्या सर्व कादंबरी वाचनीय आहेत, धन्यवाद
ReplyDeleteउत्तम विष्लेषण.
ReplyDeleteअप्रतीम लेख.
ReplyDelete