Sunday, February 9, 2020

गजाआडच्या गोष्टी



गजाआडच्या गोष्टी

                        - सुनेत्रा चौधरी

असे म्हणतात कि शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढु नये आणि तुरुंगवास तर नकोच नको. या जगात सगळ्यात वाईट ठिकाण कोणत असेल तर ते  तुरुंग. मी पुण्यामधील येरवडा कारागृह किंवा  कोल्हापूरमधील कळंबा कारागृह यांच्या जवळुन म्हणजे तसं खुपच दुरून जात असतो तेव्हा मनात एक प्रश्न येतो कि  या भिंतींच्या पलीकडील जग कसे असेल...? आज पर्यंत सिनेमांमध्ये बघितलेले तुरुंगातील जग म्हणजे निल नितीन मुकेश याच्या जेल या सिनेमामध्ये बघितलेले तुरुंगातील जग किंवा  काल पर्वा Criminal Justice   या वेब सिरीयस मध्ये बघितलेलं तुरुंगातील जग हे खरे असेल का..?  तुरुंग हे गुन्हेगारी माणसांना माणुस बनवण्याचे ठिकाण असे म्हंटले जाते. काय खरंच त्या जागेत गुन्हेगारी माणुस हा माणुस बनतो....? या प्रश्नांची उत्तरे मला पत्रकार सुनेत्रा चौधरी लिखित गजाआडच्या गोष्टी या पुस्तकातुन मिळाली.

२७० पानांचे हे पुस्तक तुम्हाला तुरुंग याठिकाणा पासुन किती दुर राहील पाहिजेल हे शिकवते. तेरा लोकांच्या मुलाखती या पुस्तकामध्ये आहेत. असे लोक ज्यांना सामाज्यामध्ये एक वेगळं आणि प्रतिष्ठेचं स्थान होत. त्यामध्ये काही दिग्ज राजकारणी आणि ओद्योगपती सुद्धा आहेत आणि काही सामान्य लोकांचे तुरुंगातील त्यांचे अनुभव लेखिकेने नमुद केले आहेत. सुमारे २०१५-१६ या कालावधी पर्यंतच्या लोकांच्या मुलाखती यामध्ये आहेत. पत्रकार सुनेत्रा यांनी अत्यंत अभ्यासपुर्वक  घेतलेल्या मुलाखती या पुस्तकामध्ये मांडल्या आहेत.

दिग्ज राजकारणी लोकांवरील गुन्हे, त्यांच्या वाट्याला आलेला तुरुंगवास आणि त्यांना मिळालेल्या सवलती आणि त्यासोबतच त्यांच्या वरील खटल्याच्या सुनावणीचा काळ त्यावेळचे अनुभव या बद्धल लेखिकेने सखोल विश्लेक्षण केले आहे. त्यासोबतच  काही दिग्ज ओद्योगपती यांच्या वरील गुन्हे आणि त्यांच्यासाठी तुरुंगात केली जाणारी खैरात त्याबद्धल लेखिकेने उत्तम प्रकारे मत मांडले आहे. एका बाजूला या दिग्ज लोकांसाठी कायदा आणि तुरुंगातील  नियम कसे लवचीक  झाले याचे विश्लेषण करते वेळी सामान्य गुन्हेगारांसाठी कायदा आणि तुरुंगातील कायदे नियम कसे आणि किती कडक होते त्याबद्धल सुद्धा लेखिकेने उघड पणे सखोल विश्लेषण केले आहे.

खुशी नावाच्या लिंगपरिवर्तित नर्तकीवर पोलीस ठाण्यामध्ये केला गेलेला सामूहिक बलात्कार, वाहिद आणि अत्याचाराच्या नानाविध तऱ्हा,एका अमेरिकन मल्लूने भोगलेला तुरुंगवास या गोष्टी वाचले वेळी मनाला खुप वेदना होतात तर वयाच्या सत्तरीतही न्यायाच्या प्रतीक्षेत,एक दहशतवाद्यांची बायको या गोष्टी वाचुन मन सुन्न होते. दिल्ली मधील तंदुर मर्डर मधील आरोपीने त्याला झालेल्या शिक्षेनंतर त्याच्या कृत्याचा त्याला झालेला पश्चाताप व्येक्त केला आहे. यासारख्या ऐकुण १३ मुलाखती या पुस्तकामध्ये आहेत. यासर्व मुलाखती तुम्हाला भारतीय तुरुंगातील विश्व कसे भयाण आहे हे सांगेल.

तुम्ही जर १००० रुपयांची चोरी केली असेल तर हवालदार तुम्हाला जीव जाईपर्यंत बदडून काढील आणि कोंदट अंधाऱ्याकोठडी मध्ये डांबून टाकेल; पण जर तुम्ही ५५,००० कोटी रुपयांची लूट केली असेल तर ४०* ४० च्या प्रशस्त,चारचार ऐरकंडिशनर्स लावलेल्या, इंटरनेट,फॅक्स,मोबाईल यासारख्या सर्व अत्याधुनिक सोयीने युक्त असलेल्या खोलीत तुमच्या राहण्याची सोया केली जाते. त्यासोबत बूट पॉलीश,स्वयंपाक सारख्या सोयीनसाठी दहा लोकांचा ताफा तुमच्यासाठी राबत असेल. तुरुंग हे अशा प्रकारचे विश्व आहे हे सुद्धा कळुन येते.

प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक,विशेषतः तरुण पिढीने वाचावे हे असे पुस्तक गजाआडच्या गोष्टी. पुस्तकाचे प्रकाशन मंजुल पब्लिकेशन हाऊस ने केले आहे. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजेल.


श्रीजीवन 

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.