लेखक - दत्ता मोरसे
या आधी जंगल सफरी खूप केल्या. ट्रेकिंगच्या माध्यमातून गड-किल्ले,डोंगर-दऱ्या आणि जंगलातलं जग अनुभवयाला
मिळालं. पण आज एक असं पुस्तक वाचायला मिळालं ज्यामधून जंगलातील अनोख
विश्व अनुभवायला मिळालं. ज्यामध्ये जंगलातल्या प्रत्येक
प्राण्याचे विश्व अत्यंत सूक्ष्म पद्धतीने वाचायला मिळाले. जंगलामधील कूस बदलणाऱ्या
निसर्गाचे रूप अनुभवायला मिळाले. लहान प्राण्यांची मोठ्या प्राण्याने केलेल्या शिकारीचा
थरार वाचल्यावर,जंगलामधील प्राण्यांची
सुरु असलेली स्वतःच्या अस्तित्वाची लढाई समजून येते.
नमस्कार मंडळी, आज मी वर उल्लेख
केल्याप्रमाणे जंगलाचे जग उलगडणारे पुस्तक लेखक दत्ता मोरसे
लिखित 'झुंड'ही कादंबरी तुमच्या
भेटीला घेऊन आलो आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आम्ही लेखक दत्ता मोरसे यांच्याशी
संपर्क साधला. त्यांचे जंगलाशी असलेले नाते,त्यांच्या 'डिस्कवरी
मराठी' ह्या YouTube चैनेल वरील व्हिडिओ बघून त्यांचे आणि जंगलाचे असणारे अतूट नातेलक्षात आले. Man vs. wild म्हणावा असे हे लेखक दत्ता मोरसे सर.
आता जरा पुस्तकाविषयी बोलतो. १०४
पानाच्या या पुस्तकामध्ये गव्याच्या दोन कळपांमधील संघर्षाची लढाई सांगितली आहे.
भुंड्या आणि रंग्या या दोन गव्यांची झुंज आणि
त्यांची आपापल्या काळपावर असलेली सत्ता आणि त्यांच्या या संघर्षाने संपूर्ण जंगल
विश्व थरारून जाते. पुस्तकाच्या सुरवातीला भुंड्या आणि रंग्या या दोघांची झुंझचे लेखकाने
केलेले चित्त थरारक वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते. लेखकाचा गव्यांविषयीचा
अभ्यास मोठा आहे. गव्यांच्या प्रत्येक हालचाली,जडण-घडणीतील सूक्ष्म तपशील लेखकाने पुस्तकामध्ये दिला आहे. प्राण्याचे
एकमेकांवर अवलंबून असणारे विश्व,विविध आवाज काढून धोक्याची इशारत देण्याचे प्रकार यावरून या भिन्न जातीच्या
प्राण्याचे एकमेकांशी असलेले नाते समजून येते.
हे पुस्तक फक्त जंगलामधील प्राण्याचे विश्वच फक्त सांगत नाही,तर त्यांच्या माणसाकडून
होणाऱ्या शिकारीवरसुद्धा भाष्य करते.लेखकाने
शिकारीचे केलेले चित्तथरारक वर्णन विशेष कौतुकास्पद आहे. मध्यंतरी पुण्याच्या कोथरूड भागामध्ये एक
गवा आला होता,पुढे माणसांच्या गर्दीत आपल्या सगळ्या अंगाचा भार धरणीवर टाकत तो
जंगलातला जीव माणसांच्या गर्दीतून कायमचा निघून गेला..... त्याचा दुर्दैवी अंत का झाला याचे उत्तर आपल्याला या
पुस्तकामध्ये मिळते. विकासाची भूक माणसाला इतकी लागली की ती मिटतच
नाही. ही भूक इतकी
वाढली आहे की त्यासाठी माणूस
वन्यप्राण्यांच्या हद्दीत शिरकाव करत आहे. त्यामुळे हे प्राणी स्वतःच्या अस्तित्वटिकवण्याच्यालढाईत सैरभैर होऊन,आपल्या घरात येत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे,प्राण्यांना
त्यांचे हक्काचे जंगल मिळालेच पाहिजेअशी भावना हे पुस्तक वाचल्यावर प्रकर्षाने मनात येते.
आता प्रश्न पडेलकी हे कोणी करायचे तर,उत्तर सोप्पं आहे मित्रांनो, नुसती झाडे लावून
भागणार नाही तर ती जोपासली पाहिजेत,जंगले जपली
पाहिजेत,जेव्हा जेव्हा जंगल पिकनिकच्या नावावर फिरायला जाऊ तेव्हा तिथे स्वच्छता
राखू, प्लॅस्टिकच्यापिशव्या,वस्तू तिथे टाकणार नाही आणि ज्वलनशील गोष्टी जंगलांपासून जेवढ्या लांब
ठेवू तेवढी जगले सुरक्षित राहतील. चला तर मग करा जंगलाच्या संवर्धनाचे आणि सुरक्षिततेचे
संकल्प करूया.
पुस्तकांचे प्रकाशन 'दर्या प्रकाशन' यांनी
केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकामधील रेखाटने प्रा.सुधीर गुरव यांनी
साकारली आहेत त्यामुळे वाचनामध्ये अजून रंजकता येते. प्रत्येकाने वाचावे आणि
प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक, जंगलाचे संपूर्ण
विश्व उलगडणारे पुस्तक लेखक
दत्ता मोरसे लिखित 'झुंड'.
जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्याचे असेल तर ९८९०४४१२१२ या नंबर वर संपर्क करा.
Nice❤️
ReplyDeleteNice
ReplyDelete