Monday, December 30, 2019

फकिरा







               फकिरा

                             लेखकलोकशाहीर अण्णा भाऊ साठे



आज एक खास पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. पुस्तक खुपच खास आहे आणि त्याचे लेखक पण खुपच खास आहेत. मराठी साहित्यामधील एक मानाचे पान मानली जाणारी कादंबरी जिला राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन गौरविले आहे. भोवतेक तुम्ही ओळखलं असेल पण ज्यांनी ओळखलं नाही त्यांच्या साठी सांगतो. मंडळी मी बोलत आहे ती कादंबरी म्हणजे आदरणीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहुन अजरामर केलेली कादंबरी म्हणजे फकिरा.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या लेखणीने समाजामध्ये प्रबोधन केले. अण्णा भाऊ साठे यांची शाहिरी कवने आज हि समाजामध्ये प्रबोधनाचे काम करत आहेत. शाहिरांविषयीची एक गोष्ट माझ्या मनाला भावली ती म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे भोगले, जे पाहिलं, ज्या गोष्टी त्यांच्या अजु बाजूला घडल्या, जी माणसं त्यांच्या आयुष्यात आली त्यांच्या वर ओढलेले प्रसंग या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या लिखाणात आणल्या. त्यामुळे त्यांचे लेखन मनाला स्पर्श करून जाते. शाहिरांच्या लेखणीचे वैशिष्ठ म्हणजे घडणाऱ्या घटनेचे आणि त्यामागची परिस्थिती यांचं वर्णन अगदी सध्या भाषेत आणि मार्मिकते ने करतात. कोणतीही गोष्ट जास्त वाढवून नाही तर सोप्या शब्दांनी. शाहीरांचे असे लिखाण वाचले कि न काळत वाचक त्यांच्या लेखणीच्या प्रेमात पडतो. शाहिरांचे असे किती तरी लिखाणे,शाहिरी कवण आहेत जे आज हि वाचले किंवा ऐकले तरी मनामध्ये एक वेगळी स्फुर्ती निर्माण होते. शाहीरांच्या अशाच एक शाहिरीचं नाव इथे मी मुदाम घेतो ती म्हणजे "माझी मैना गावाकडं राहिली". लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाणा विषयी  आणि त्यांच्या विषयी बोलावं तितकं कमीच आहे.

त्यांच्या लिखाणानी समृद्ध झालेली आणि मराठी साहित्य विश्वामध्ये सोनाचे पण ठरलेली कादंबरी म्हणजे फकिरा. कादंबरीची कथा हि स्वतंत्र पुर्व काळातली आहे. अगदी शाहिरांचा नुकताच जन्म झाला होता तेव्हाची. शाहीर जस जसे मोठे होत गेले तेव्हा त्यांनी फकिरा विषयी त्यांच्या घरच्यांकडुन ऐकली होती. ती कथा जेव्हा त्यांनी ऐकली तेव्हा पासुन त्यांचे मन त्यानं गप्प बसु देत नव्हते. हि कथा आपण कागदावर उरवावी असे त्यांना वाटत होते. आणि शेवटी त्यांनी हि कथा कागदावर उतरवली. गरिबांच्या नेत्याला त्यांच्या अवलियाला त्यांनी खरी आदरांजली दिली.
फकिरा हि कादंबरी १४५ पानाची आहे. कथे ची सुरवात गावामधील जत्रेतील मानाच्या जोगणीला पळवण्यावरून होते. फकिराचा बाबा राणोजी आपल्या गावाचं भलं व्हावे, आपल्या गावात दरवर्षी जत्रा भरावी, त्यामुळे गावच्या लोकांना रोजगार मिळेल, गावामध्ये उत्सवाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, म्हणुन जीवावर उदार होऊन शिगावची जोगीण पळवुन आणते वेळी झालेला त्याचा मृत्यु, याचे  वर्णन मनाला स्पर्श करून जाते. आपल्या बापाचा झालेला मृत्यु आणि ज्या शवर्याने तो लढला या सगळ्या गोष्टीचा परिणाम फकीरावर होतो. आपणही आपल्या बापा सारखं गावासाठी काहीतरी करायचं या भावनेने फकिरा वाढत जातो.

आपल्या पतीचा झालेला मृत्यु आणि माघारी आपल्या अंगावर पडलेला संसाराचा गाडा चालवत दोन लहान मुलांना वाढवणारी राधाबाई. राधाबाईचा फकीरावर विशेष जीव. त्या आईच काळीज आपल्या लेकासाठी किती तुटत असत या विषयी वाचते वेळी आई मुलाचं नातं काही वेगळंच असत याची जाणीव होते. शाहिरांनी आपल्या लेखणीतुन या आई मुलाच्या नात्याला कादंबरीमध्ये एक हळुवार स्पर्श दिला आहे आणि तो मनाला स्पर्श करतो. हि कथा एकट्या फकीराची नाही तर दौलती,राहीबाई,साधु,पिरा, सावळा, बळी,घामांडी,हरी खंडू, भिवा ह्या आणि समस्त महार मांग जमातीची हि कथा आहे. स्वतंत्र पूर्वकाळा पासुन महार,मांग जाती वर होणारे अन्याय त्यांचे होणारे हाल, त्यांना मुदामून डावले जाणे,त्यांचे हक्क कडुन घेतले जाणे, त्यांना गाव पासुन आपल्या माणसं पासुन दूरकरणे यासर्व गोष्टी शाहिरांनी अत्यंत मार्मिक पणे लिहिल्या आहेत.

मानाची समजली जाणारी जोगीण ज्यागावात असेल त्या गावाला जत्रा भरवण्याचा हक्क असतो. ती मानाची जोगीण आपल्या बापाने गावासाठी जीवावर उधार होऊन गावाला परत मिळवुन दिली आणि त्यामध्ये त्याने आपला जीव गमावला.आपल्या बापाचे बलिदान आपण वाया जाऊ देणार नाही. याविचारांनी फकिरा आणि सगळा गाव दरवर्षी होणाऱ्या जत्रेमध्ये जोगिणीचे रक्षण करतात. पुढे काही अशा गोष्टी घडतात आणि फकिराचे आणि समस्त महार,मांग जातीचे आयुष्य बदलुन जाते. आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी फकिरा आपल्या साथीदारांसोबत धनदांडग्यांना लुटून आपल्या गोरगरीब जातील जागवणायचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे हलगी वाजवून लुटालूट करणारी हि वाघांची टोळी असते. कादंबरीमधील प्रत्येक परिस्थितीचे वर्णन वाचुन मन हरखुन जाते. कादंबरीमध्ये अशी काही वाक्य आहेत जी वाचते वेळी वेगळीच मज्या येत. उदा. चांदणं दुधासारखं वर्षत होत, अशा प्रकारची किती तरी वाक्य कादंबरी मध्ये आहेत ज्याने शाहिरांच्या लेखणीची ताकद कळुन येत. वाचक त्यांच्या लेखणीच्या प्रेमात पडतो.

कादंबरीची भाषा आमच्या पश्चिम महाराष्ट्राची आहे. त्यामुळे तर कादंबरी आपलीशी वाटते. कादंबरीचे मुखपृष्ठ हे जोशी आर्टस् यांनी केले आहे. कादंबरीचे प्रकाशन गुलाबराव मारुतीराव कारले  सुरेश एजन्सी यांनी केले आहे. प्रत्येक वाचकाने वाचावी आणि प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावी अशी कादंबरी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीने अजरामर झालेली कादंबरी फकिरा.



- श्रीजीवन तोंदले

No comments:

Post a Comment

धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.