लेट नाईट मुंबई
लेखक
- प्रवीण धोपट
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणारे हे महाशहर. या महाशहराने आजवर खूप लोकांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. प्रत्येक जण या शहराकडे आकर्षित झाला. प्रत्येक जण या शहरात येतो ती काही स्वप्ने घेऊन, काही तरी मोठा करायची स्वप्नं, स्वतःला सिद्ध करायची स्वप्नं, या शहरामध्ये छोटंसं का असेना पण आपल्या स्वतःचे घर असावे हे तर मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हणून तर या मुंबईला स्वप्ननगरी म्हंटल जातं. या मायानगरीने आजवर खूप घाव सोसले,चांगल्या वाईट आठवणी स्वतःमध्ये साठवून घेतल्या. तरी सुद्धा हे शहर आपल्या जागी घट्ट पायरोवुन उभे आहे. पहाटेच्या ४:३० च्या पहिल्या लोकल ने मुंबईच्या दिवसाची सुरवात होते. गतिमान असलेल्या या शहराला थांबायची सवय नाही. ही मायानगरी दिवसभर घड्याळाच्या काटयावर धावत जरी असली तरी दिवस मावळल्यावर, दिवसाचा पालनहार सूर्य समुद्राच्या गर्भामध्ये विलीन होतो तेव्हा हे शहर रात्रीच्या मिठीत सामावून जाते. या शहराच्या रात्रीचे वर्णन लेखक प्रवीण धोपट यांनी त्याच्या लेट नाईट मुंबई या पुस्तकामध्ये केले आहे.
१६६ पानांच्या या पुस्तकामधून ३१ प्रकारणांद्वारे लेखकाने मायानगरी मुंबईची रात्र कशी असते याचे शब्दचित्रित वर्णन केले आहे. रात्रीच्या शांतते त्यासर्वांची एक लयबद्ध हालचाल सुरु असते ती संपूर्ण रात्र जागून आपलं काम पूर्ण करण्यासाठी.रात्रीच्या या विश्वामध्ये रिक्षा-टॅक्सीवाल्याने पासून ते सायकल चहावाले, कॉल सेन्टरचे कर्मचारी, वेश्या, कारखान्यातील, मेट्रो चे कामगार हे आणि कितीतरी लोक ज्यांची रात्री सकाळ होते ते बाहेर पडतात. यासोबतच पार्वतीचे बाळ जन्माला येत आहे या प्रकरणातून गणेश मूर्ती घडविणाऱ्या कामगारांची आणि गणेश उत्सवाची सुरुवात ते मुंबईची शान असणाऱ्या गिरगाव चौपाटी वरील रात्रीचे दृश्य आणि त्यासोबतच गणपती विसर्जनाच्या वर्णनापर्यंत सर्वगोष्टी वाचते वेळी नजरेसमोर उभ्या रहातात. पुस्तकांमधील प्रत्येक प्रकरणाविषयी बोलावे तितके कमीच आहे. कारण वाचक जर मुंबई शहराच्या बाहेरचा असले तर त्याला यासर्व गोष्टीची त्या सर्व परिसराची अपृवई वाटेल, तो प्रत्येक परिसर वाचकाला त्याच्याकडे आकर्षित करेल आणि जर वाचक मुंबईचा असेल तर त्याला त्या परिसरामध्ये रात्री एक फेरफटका मारावा याचा मोह होईल. कारण लेखकाने खूप प्रभावीपणे मुंबई शहरातल्या रात्रींचे शब्दचित्रण केले आहे. प्रत्येक शहराची स्वतःची अशी वेगळी ओळख असते. आणि मुंबई हे महाशहर त्याच्या प्रत्येक गोष्टीची वेगळी आणि अनोखी ओळख ठेवून आहे. दिवसा धावणारे हे शहर रात्री मात्र शांत त्याच्या धुंदीमध्ये जागत रहाते....
पुस्तकाचे प्रकाशन रोहन प्रकाशन यांनी केले आहे. पुस्तकांचे मुखपृष्ठ राजू देशपांडे यांनी साकारले आहे. पुस्तकांमध्ये कॅमेऱ्याने टिपलेली लेट नाईट मुंबईची छायाचित्रे वाचकाचे लक्षवेधून घेतात. ती छायाचित्रे विक्रम ताटवे यांनी काढली आहेत. प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे आणि प्रत्येक वाचकाने वाचावे असे हे पुस्तक लेखक प्रवीण धोपट लिखित लेट नाईट मुंबई !
जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर click करा
https://rohanprakashan.com/product/late-night-mumbai/
आमच्या चॅनेलला आजच भेट द्या https://youtu.be/5VIjOdHZY1w
No comments:
Post a Comment
धन्यवाद. ब्लॉग वरील इतर पुस्तक परिचय सुद्धा वाचा.